Dr. Shrikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, त्यांना बेताल बोलायची सवय, लक्ष देऊ नका...

अभिनेत्री कंगना राणावत ( Kangana Ranaut ) यांनी एका खासगी दुरचित्रवाहिनीवर वादग्रस्त वक्तव्य केले.

सरकारनामा ब्युरो

डोंबिवली : अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका खासगी दुरचित्रवाहिनीवर वादग्रस्त वक्तव्य केले. 1947 साली भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती. खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं, असे वक्तव्य कंगनाने केलं. या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून टीका होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिला. शिवसेनेचे खासदार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. Dr. Shrikant Shinde said, he has a habit of talking nonsense. Don't target them ...

खासदार श्रीकांत शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवली पश्चिम येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळेस त्यांनी राणावतच्या वक्तव्याचा निषेध केला.

राणावत यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. याबाबत आज शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील राणावत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. खासदार शिंदे यांनी कंगना हिला असाच बेताल व्यक्तव्य करण्याची सवय आहे. त्यांच्या वक्तव्याकडे कोण लक्ष देऊ नये. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे आम्ही निषेध व्यक्त करते असं सांगितलं.

राणावत यांच्या वक्तव्याचा भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच अनुपम खेर सह चित्रपट जगतातील व्यक्तींनीही कंगनाच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT