<div class="paragraphs"><p>Durga Tambe</p></div>

Durga Tambe

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

दुर्गा तांबे विरोधकांवर संतापल्या, म्हणाल्या...

आनंद गायकवाड

संगमनेर ( जि. अहमदनगर ) : संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. संगमनेर नगरपालिकेने केलेली विकासकामे निकृष्ट असल्याचे सांगत भाजपच्या ( BJP ) नगरसेवक व कार्यकर्त्यांनी संगमनेरमध्ये नुकतेच आंदोलन केले होते. या आंदोलनाला काँग्रेसच्या ( Congress ) नेत्या तथा संगमनेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. Durga Tambe lashed out at the opposition, saying ...

दुर्गा तांबे म्हणाल्या, नगरपालिका निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने ते स्टंटबाजी करत आहेत. त्यांना जनता ओळखून आहे. अंत्यसंस्कारासारख्या तातडीच्या विधीसाठी नागरिकांच्या आग्रहास्तव अमरधाममध्ये काही कामे विविध टप्प्यांवर केली. त्याचे भांडवल करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा पलटवार दुर्गा तांबे यांनी भाजपच्या आंदोलकांवर केला.

त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना महामारीत संगमनेर शहर मेडिकल हब बनले होते. स्थानिकांसह आसपासच्या तालुक्यांतील मोठी रुग्णसंख्या संगमनेरात उपचारासाठी आली होती. या काळात नगरपालिकेने कोविड रुग्णांच्या मोफत अंत्यविधीसह सर्व जबाबदारी सामाजिक भावनेतून पार पाडली. अमरधाममध्ये येणाऱ्या विविध अडचणी व कोविड काळात दिवसाला दहा, बारांच्या संख्येत होणारे अंत्यविधी पाहता, अमरधाममध्ये काही तातडीची कामे करण्याची आवश्यकता होती. नगरपालिकेने पुढाकार घेत मिळालेली बक्षिसे व इतर निधीतून गरजेप्रमाणे ही कामे पूर्ण केली.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यापासून आजी, माजी नगरसेवक असलेल्या काहींनी भाजपच्या बॅनरखाली ठेकेदाराच्या हितासाठी अमरधामच्या कामात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करीत आंदोलनातून राईचा पर्वत केला आहे. परंतु अमरधामच्या कामाची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर या आंदोलनाची धार कमी झाली आहे, असे दुर्गा तांबे यांनी सांगितले.

त्यावेळी ते गप्प का?

आपल्या नगरसेवकपदाच्या काळात प्रभागात रस्ताही करू न शकलेले विरोधक खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत आहेत. काही जण 20 वर्षे आमच्यासोबत होते. ते त्यावेळी गप्प का होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निधीत कमी पडलेले पैसे नगरपालिकेतून टाकून कामे केली. आमची कामे व लोकप्रियता विरोधकांना खुपत असल्यानेच ते असा स्टंट करत असल्याची टीका नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT