ED Raid in Sangli : ED Raid in Sangli ED Raid in Sangli big businessman Parekh brothers  Sarkararnama
पश्चिम महाराष्ट्र

ED Raid in Sangli : ईडीची तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच; सांगलीतील बड्या व्यावसायिकांवर टाच !

ED Raid in Sangli big businessman Parekh brothers : सांगलीतील व्यावसायिकांवर ईडीची कारवाई..

सरकारनामा ब्यूरो

Sangli News : मागील दोन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी ईडीची छापेमारीची कारवाई सुरू आहे. ठाकरे गटातील निकटवर्तीय तसेच काही सनदी अधिकाऱ्यांवर ईडीने छापेमारी केली होती. आज (२३ जून) रोजी सलग तिसऱ्या दिवशीही ईडीची छापेमारी सुरू आहे. सांगली शहरातील त्रिकोणी बाग परिसर येथे पहाटे पाचपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या दोन पथकांनी सांगली शहरात ईडीची कारवाई सुरू आहे. (ED Raid in Sangli big businessman Parekh brothers)

प्राप्त माहितीनुसार, ईडीने आपल्या दोन दोन पथकाच्या साहाय्याने सांगलीतील शिवाजीनगर येथे प्रसिद्ध व्यावसायिक पारेख बंधूच्या बंगल्यामध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. या बंगल्याबाहेक सुरक्षेचे बंदोबस्त करण्यात आले आहे. बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत.

ईडीची पथके सुरेश आणि दिनेश पारेख बंधू यांच्या शिवाजीनगर स्थित दोन्ही बंगल्यामध्ये गेली आहेत. ईडी अधिकारी येथे कसून चौकशी करत आहेत. पारेख हे सांगली शहरातील प्रसिद्ध आणि बडे व्यावसायिक आहेत. पारेख बंधू यांचा इलेक्ट्रिकलचा मोठा व्यावसाय आहे.

आर्थिक गैरव्यवहार आणि व्यावसायातील अनियमितता पारेख बंधूंनी केला असल्याचा ईडीला संशय आहे. याच शक्यतेवरून ही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीची अधिक माहिती देण्यास ईडी तूर्तास तरी नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT