crime News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Crime News : शिक्षण क्षेत्र हादरलं! अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येच शिक्षण संस्थेचे संचालक रक्ताच्या थारोळ्यात सापडले; दर्शनाला जाण्यापूर्वीच निर्घृण हत्या

education institute director killed shocking crime news : दर्शनाला जाण्यापूर्वीच शिक्षण संस्थेच्या संचालकांची अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये निर्घृण हत्या. वाचा संपूर्ण बातमी.

Rashmi Mane

पलूस येथील पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय ६०, रा. मारुती मंदिरजवळ) यांचा अनोळखींनी त्यांच्याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये निर्घृण खून केल्याचा प्रकार आज रात्री ८.४५ वाजता उघडकीस आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस पंचनामा व तपास करत होते. संजय परांजपे यांच्या हत्येने पलूस शहर हादरले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारुती मंदिराजवळच संजय परांजपे यांचा जुना वाडा आहे. वाड्यालगतच त्यांचे नवीन गजानन सदन नावाचे अपार्टमेंट आहे. तेथून सायंकाळी ५.३० वाजता ते श्री धोंडिराज महाराज मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून बाहेर पडले. परत आल्यानंतर अपार्टमेंटमध्ये असणाऱ्या पार्किंगमध्ये मोटारसायकल पार्क केली; मात्र मंदिरात गेलेले वडील घरी आले नाहीत म्हणून घरच्यांनी त्यांना फोन केला मात्र, ते उचलत नव्हते.

त्यांच्या मुलाला अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये रक्ताचा सडा दिसला. पुढे गेल्यानंतर संजय परांजपे जखमी अवस्थेत पार्किंगमध्येच एका कोपऱ्यात आढळले. मुलगा मंदार याने ओरडा केल्यानंतर शेजारी जमा झाले. त्यांनी पलूस पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पलूस पोलिसांनी पंचनामा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संजय परांजपे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. संजय परांजपे हे पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू होते. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. तेथे पोलिसांचा बंदोबस्त होता.

थोरल्या भावाला अश्रू अनावर सांगली येथे राहणारे संजय परांजपे यांचे थोरले बंधू उदय परांजपे यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने पलूस येथे रवाना झाले. तोपर्यंत संजय परांजपे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेला होता. ग्रामीण रुग्णालयात धाकट्या भावाचा मृतदेह पाहून उदय परांजपे यांनी हंबरडा फोडला. त्यांना अश्रू अनावर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT