Tiger
Tiger Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tiger : पश्चिम महाराष्ट्रात आठ वाघांचा संचार

सचिन शिंदे

कऱ्हाड : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात संचार असणाऱ्या आठ वाघांच्या अधिवासावर वन विभागासह वन्यजीव अभ्यासकांनी शिक्कामोर्तब केले आहे. दक्षिण कोकण आणि कोल्हापूरचा वनविभाग आणि शास्त्रज्ञांना आठ वाघांचे दर्शन झाले आहे. यापैकी वाघाची जोडी जंगलात कायमस्वरुपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे, अशीही माहिती वन्यजीव विभागाने दिली.

कर्नाटक आणि गोवा राज्यांतून काही काळासाठी कोकण आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात वाघ येतात. गुरांची शिकार होत असल्याने भागांत वाघ दिसून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली.

दोनवर्षांपूर्वी कोकण आणि कोल्हापूरात जाहीर झालेल्या संरक्षित क्षेत्रात आठ वाघ वावरताना शास्त्रज्ञांना दिसले. २०१४ सालापासून वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट संस्था कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकणातून वाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. आठ वर्षांपासून वाघाची जोडी कोकणात कायमस्वरुपी राहत असल्याची वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी दिली.

ते म्हणाले, अन्य सहा वाघांचे दर्शन सतत दिसून येत असले तरीही त्यांना स्थानिक वाघ म्हणणे घाईचे ठरेल. दरवर्षाला कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यांत किती वाघ स्थायिक झालेत. याबाबतची खात्रीलायक माहिती मिळेल. सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT