Shiv Sena (Eknath Shinde faction) Solapur district head Mahesh Chivate, brother of OSD Mangesh Chivate, injured in a local attack incident. Police investigation underway. 
पश्चिम महाराष्ट्र

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या OSDच्या भावावर हल्ला : स्कॉर्पिओ गाडी अडवून मारलं; शिवसेनेतीलच नेत्यावर संशय

Shiv Sena leader Mahesh Chivate : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाला. ते शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे भाऊ असून घटनेची चौकशी सुरू आहे.

Hrishikesh Nalagune, Vijaykumar Dudhale

सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज (०४ ऑक्टोबर) सकाळी साडेआठच्या सुमारास करमाळा तालुक्यातील हिवरवाडी शिवारात हल्ला झाला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चिवटे यांनी हा हल्ला शिवसेनेचे स्थानिक नेते दिग्विजय बागल यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश चिवटे करमाळा येथील श्रीदेवीचा माळ रोड येथील घरातून सकाळी सव्वा सात वाजता हिवरवाडी येथील आपल्या शेतात गेले होते. शेतातील काम उरकून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास स्कार्पिओ गाडीतून करमाळ्याकडे परत येत होते. त्यावेळी हिवरवाडीजवळ कॅनलवर त्यांच्या गाडीला टू व्हीलर आडवी लावून त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, चिवटे यांनी हा हल्ला शिवसेनेचे स्थानिक नेते दिग्विजय बागल यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. मात्र बागल यांनी त्याचा इन्कार केला असून हा हल्ला वैयक्तिक कारणातून झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिवरवाडीत खत उधारीच्या वादात शिवीगाळ केल्याने महेश चिवटेंवर हल्ला झाला असल्याची माहिती मला मिळाली. चिवटेंचे आरोप खोटे आहेत, या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. रश्मी बागल ह्या सध्या पुण्यात असून मी पूरग्रस्त भागातील दौऱ्यात व्यस्त आहे, असा खुलासा दिग्विजय बागल यांनी केला आहे.

महेश चिवटे हे शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख असून ते मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. मंगेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून ते काम पाहतात. यापूर्वी शिंदे मुख्यमंत्री असताना ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख होते. सध्या ते एकनाथ शिंदेंचे ओएसडी म्हणूनही काम पाहतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT