Jayant Patil| 
पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंनी कामाला लागावं, पुजा-अर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमावा- जयंत पाटील

Jayant Patil| CM Eknath Shinde| एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता स्थिर झाले पाहिजे.

सरकारनामा ब्युरो

साेलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा देव-धर्म,पूजा अर्चा करण्यातच त्यांचा जास्त वेळ जाताेय. पण आत त्यांनी या गोष्टी बाजूला ठेवून लवकर कामाला लागले पाहिजे. पूजा-अर्चा करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, त्यासाठी एक वेगळ खातंही बनवावं. त्यांच्याकडे ही जबाबदारी द्यावी, पण शिंदेंनी आता कामाला लागावं ही आमची विनंती आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. शुक्रवारी (१२ ऑगस्ट) सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता स्थिर झाले पाहिजे. सरकारमध्ये असताना मी त्यांच्यासोबत कामही केलं आहे. पण ते काम करतात, कष्ट करतात. पण सरकार चालवणं वेगळं आणि एखाद्याला फाेन करुन पाेलिस स्टेशनमधून साेडा म्हणणं वेगळं, पण आता त्यांनी सरकारमधील वेगवेगळ्या विभागांना भेटी द्यायला हव्यात. ते करू शकणार नाहीत असं माझं म्हणण नाही. पण त्यांनी या कामाकडे लक्ष दिले पाहिजे. पूजा-अर्चा करण्यात त्यांचा वेळ गेला तर ते कामाकडे कधी लक्ष देणार, असा माझा प्रश्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तर प्रशासक आहे. पण भाजपने त्यांना या सरकारमध्ये त्यांना दोन नंबरची जागा दिली. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती असती. पण भाजपने असा निर्णय का घेतला माहिती नाही, असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थाल यांना घेऊन सत्ता स्थापन केली. पण सत्ता स्थापन होऊनही इतके दिवसात त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केले नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे लोकही दहा वेळा विचार करत आहेत. यावरुन एकनाथ शिंदे हे संकटात असल्याचं लक्षात येतयं. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच, शिंदे गटानं शिवसेना भवन उभारलं तरी त्या मंदिरात देव कुठंय, असा सवालही उपस्थित केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT