Deepak Pawar, Shivendraraje Bhosale
Deepak Pawar, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jawali APMC : त्यांच्या हट्टीपणामुळे निवडणूक; आता आत्मपरिक्षण करा : शिवेंद्रराजेंचा दीपक पवारांना टोला

Umesh Bambare-Patil

Jawali APMC News : एका व्यक्तीच्या हट्टीपणामुळे व ‘मी’ पणामुळे ही निवडणूक झाली. पण, आमचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. तर त्यांच्या उमेदवारांना शंभरच्यावर मते मिळालेली नाहीत. त्यामुळे स्वत:ला वेगळ समजणाऱ्यांनी आता आत्मपरिक्षण करावे. तालुक्यातून ते हद्दपार झाले असून आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांना जागा दाखवू, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी दीपक पवार Deepak Pawar व सदाशिव सपकाळ यांना लगावला.

जावळी Jawoli, महाबळेश्वर बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही. या विजयानंतर जावळीत जल्लोष झाला. यानंतर शिवेंद्रसिंहराजेंशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी विजयी उमेदवार व नेते मंडळी उपस्थित होती.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, एका व्यक्तीच्या हट्टीपणामुळे व ‘मी’ पणामुळे ही निवडणूक झाली. काही लोकांना आपण काही तरी वेगळे आहोत, वेगळे करुन दाखवू शकतो अशी ‘मी’ पणाची बाधा झाली होती. यातून त्यांनी पॅनेल दिले. पण, आमचे शेतकरी विकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

तर त्यांच्या उमेदवारांना शंभरच्यावर मते मिळालेली नाहीत. त्यामुळे स्वत:ला वेगळ समजणाऱ्यांनी आता आत्मपरिक्षण करावे. आता तालुक्यातून ते हद्दपार झाले असून आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही त्यांना जागा दाखवू, असा इशारा आमदार भोसले यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT