<div class="paragraphs"><p>Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge</p></div>

Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge

 

sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

कट्टर विरोधक असलेल्या घाटगे आणि मुश्रीफ गटाचे असेही मनोमीलन

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर नूतन संचालकांनी ग्रामविकासमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची भेट घेऊन आभार मानले. संचालकांनी मुश्रीफ यांची जिल्हा बँकेवर (Kolhapur District Bank Election) बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

छत्रपती शाहू कारखाण्याची निवडणूक आणि हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडला. कागल तालुका विकास संस्था गटातून 'शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे समर्थक बाबासो हिंदुराव पाटील यांचा अर्ज होता. घाटगे यांनी पाटील यांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली. त्याच्या सुचनेनुसार पाटील यांनी अर्ज मागे घेतला आणि मुश्रीफ बिनविरोध झाले. त्याच दरम्यान शाहू-कागल'ची निवडणुकही बिनविरोध झाली. जिल्हा बँकेत 'शाहू'साठी तडजोड झाली का, असा प्रश्‍न यानिमित्ताने राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

बिनविरोध निवडणुकीनंतर ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृहावर कारखान्याचे नूतन संचालक अमरसिंह घोरपडे, युवराज अर्जुना पाटील, प्रा. सुनील मगदूम व राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील-बामणीकर यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली. दिवसभरात सकाळपासूनच या दोन्ही निवडीच्या घटना अत्यंत संथ गतीने सुरू होत्या. दुपारी दोननंतर या घटनांनी चांगलाच वेग घेतला. बँकेसाठी अर्ज भरलेल्या समरजितसिंह घाटगे समर्थकांनी व शाहू साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेल्या मुश्रीफ समर्थकांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे कारखान्याचा व जिल्ह बॅंकेचा तिढा सुटला.

जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले यांचे कौतुक केले. शाहू साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात व बँकेवर मंत्री मुश्रीफ यांचा रस्ता मोकळा करण्यामध्ये भोसले यांनी चांगला समन्वय घडवून आणल्याचेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT