Sarpanch Disqualified
Sarpanch Disqualified sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : शासकिय जागेत अतिक्रमण करणे भोवले; पुसेगावचे सरपंच अपात्र

Umesh Bambare-Patil

-ऋषिकेश पवार

Khatav News : राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय कृष्णा मसणे यांना सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधकाम केल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी Satara Collector यांनी अपात्र ठरवले आहे. अपात्र ठरविण्यात आल्यामुळे श्री. मसणे यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जानेवारी २०२१ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेनंतर सरपंचपद Sarpanch पदासाठी आरक्षित झालेली अनुसूचित जातीचा पुरुष या एकमेव जागेवर निवडून आल्याने विजय मसणे यांची सरपंचपदावर वर्णी लागली होती.

विजय मसणे यांच्या मालकीच्या पुसेगाव हद्दीतील मिळकत क्रमांक ८४१ चे क्षेत्र सार्वजनिक रस्त्याच्या हद्दीत असल्याचे भूमिअभिलेख अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालात निदर्शनास आले आहे. त्यामुळे मसणे यांनी शासनाच्या जागेत कायम स्वरुपी बांधकाम करत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे.

याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा घनशाम मसणे यांनी विजय मसणे यांच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. तो ग्राह्य मानून जिल्हाधिकाऱ्यांनी विजय मसणे यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ज-३) व कलम १६(२) अन्वये अपात्र ठरवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT