Ahmednagar ZP
Ahmednagar ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा परिषदेत सल्लागार समित्या झाल्या स्थापन

दौलत झावरे

अहमदनगर - जिल्हा परिषदेत प्रशासक कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीसाठी निर्णय घेण्याकरिता विविध स्तरांवर सल्लागार समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( Establishment of Advisory Committees in Zilla Parishad )

राज्यातील 25 जिल्हा परिषदांचा 20 मार्चला व 293 पंचायत समित्यांचा 13 मार्चला कार्यकाळ संपलेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा समावेश आहे. त्यावर प्रशासकांची नियुक्ती झालेली आहे. प्रशासक कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधील विभागनिहाय योजनांची अंमलबजावणी करणे, शासन निधी, अभिकरण निधी, जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त निधीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व विषय समिती यांचे अधिकार मर्यादेत नियोजन करून प्रत्यक्ष योजना अंमलबजावणी करण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरांवर विविध सल्लागार समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

सभेच्या अनुषंगाने सल्लागार समिती

अध्यक्ष ः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक

सदस्य ः सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व पंचायत समिती सदस्य, कार्यकारी अभियंता, पंतप्रधान ग्रामसडक योजना

सदस्य सचिव ः ः उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

स्थायी समिती सभेसाठी सल्लागार समिती

अध्यक्ष ः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक

सदस्य ः सर्व विभागांचे प्रमुख

सदस्य सचिव ः ः उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.

विषय समितीच्या सभेसाठी समिती

अध्यक्ष ः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक

सदस्य ः सर्व विषय समित्यांशी संबंधित निगडित तालुकास्तरीय कार्यालयप्रमुख

सदस्य सचिव ः ः संबंधित विभागाचे प्रमुख.

जिल्हा ग्रामविकास निधी सल्लागार समिती

अध्यक्ष ः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रकल्प संचालक

सदस्य ः जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, राष्ट्रीयीकृत / जिल्हा बँक प्रतिनिधी.

सदस्य सचिव ः उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग.

पंचायत समिती स्तर

अध्यक्ष ः गटविकास अधिकारी

सदस्य ः सर्व तालुकास्तरीय कार्यालयप्रमुख

सदस्य सचिव ः सहायक गटविकास अधिकारी.

सल्लागार समित्यांची कामकाजाची कार्यपद्धती

- जिल्हास्तरावरील समित्यांच्या प्रत्येक सोमवारी बैठका

- पंचायत समिती स्तरावरील समित्यांच्या बैठका पहिल्या व तिसऱ्या सोमवारी

- जिल्हा परिषद सर्वसाधारण समित्यांचा बैठकीचा अजेंडा नऊ दिवस अगोदर द्यावा.

- विविध विषय समित्यांचा बैठकीचा अजेंडा तीन दिवस अगोदर द्यावा

- पंचायत समिती स्तरावरील समिती बैठकीचा अजेंडा सात दिवस अगोदर द्यावा

- बैठकीनंतर संबंधित सल्लागार समित्यांनी कामकाजाचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT