पश्चिम महाराष्ट्र

गुवाहटीतही माण, खटावच्या माणसांनी सगळ ओक्के करून दाखवलं...

गुवाहाटीत Guwahati सुद्धा शहाजी बापूंसह Shahaji Patil चाळीस आमदारांना 40 MLAs रोज अस्सल माणदेशी जेवणाचा Mandeshi meal डबा मिळत होता. देशातील कुठलं शहर असं नाही जिथं माण खटावची Maan, Khatavs Peoples माणसं नाहीत.

फिरोज तांबोळी

गोंदवले : गुवाहाटीत असताना काय हाटील.., काय झाडी.., काय डोंगार.. सगळं कस ओक्के मध्ये असणाऱ्या आमदार शहाजी बापूंसाठी अस्सल माणदेशी जेवणाची सोय करून माण खटावच्या माणसांनी 'सगळं ओक्के' करून दिलं होतं. हे गुपित माणचे आमदार जयकुमार गोरेंनी विरकरवाडीत उलगडलंय.

विरकरवाडी (ता.माण) येथे आयोजित बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरणासाठी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे एकत्र आले होते. यावेळी आमदार गोरे यांनी शहाजी पाटील यांच्याबाबतीत गुवाहाटीत घडलेला किस्सा सांगितला.

आमदार गोरे म्हणाले, देशाचं कुठलं बी शहर असं नाय जिथं माण खटावची माणसं नाहीत. याचा प्रत्यय बापूंना गुवाहाटीत आला. तिथं सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत्या. परंतु तिथून त्यांचा फोन आला की, मला इथल्या जेवणाचं काय जमत नाय. मला भाकरी, भरलं वांग, ठेचा, असं काय मिळतंय का बघा.

बापूंची ही मागणी पूर्ण करणारी आमची माण खटावची माणसं गुवाहाटीत सुद्धा आहेत. त्यामुळे गुवाहाटीत सुद्धा शहाजी बापूंसह चाळीस आमदारांना रोज अस्सल माणदेशी जेवणाचा डबा मिळत होता. देशातील कुठलं शहर असं नाही जिथं माण खटावची माणसं नाहीत.

माण तालुक्यातील १०३ गावांना पाणी पोचलंय. येणाऱ्या तीस चाळीस दिवसांत जिहे कठापुरचे पाणी येतंय. आता काही अडचण नाही. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत 'सगळं ओक्के' आहे असेही आमदार गोरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT