Shankarrao Gadakh, Newasa Shivsena
Shankarrao Gadakh, Newasa Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माजी मंत्री गडाखांचा मुरकुटे गटाला दे धक्का..

विनायक दरंदले

सोनई ( जि. अहमदनगर ) - शिवसेनेत फुट पडल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेले आहे. शिवसेनेचे शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे मंत्रीपद गेले असले तरी नेवासे तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढतच चालली आहे. ( Ex-minister Gadakh's Murkute gave a shock to the group.. )

मागील सहा महिन्यांपासून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाला लागलेली आहोटी थांबायचे नाव घेत नाही असेच दिसते. बेलपिंपळगाव पंचायत समिती गणातील मुरकुटे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेकांनी आज माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नेतृत्व मान्य करुन हातात शिवबंधन व गळ्यात भगवे उपरणे घालून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गडाख यांचे मंत्रिपद गेले असले तरी तालुक्यात विकास कामांचा धडाका पाहून कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहेत. आज गोधेगाव दौऱ्यात मुरकुटे गटातील नवनाथ पठाडे, दत्तात्रेय शेळके, रमेश चंधरी, महिपत शेळके व बाळासाहेब आहेर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे बेलपिंपळगाव पंचायत समिती गणात गडाखांची बाजू अधिकच मजबूत झाली आहे.

गोधेगाव येथे माजी मंत्री गडाख यांचे आगमन होताच युवकांनी जल्लोषात स्वागत करुन गावातून मिरवणूक काढली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजकारण नाही तर विकासकामांसाठी मी नेहमी कटिबद्ध असतो गोधेगाव साठी महत्वाच्या असणारी घोगरगाव पाणी योजनेसह विविध कामास निधी दिलेला आहे.पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांचा निश्चित सन्मान केला जाईल असे गडाख यांनी सांगितले. कार्यक्रमास गोधेगावचे सरपंच राजेंद्र गोलांडे,'मुळा'चे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, शिंगवेतुकाईचे माजी सरपंच योगेश होंडे,सुदाम तागड उपस्थित होते.प्रास्ताविक बाळकृष्ण भागवत यांनी केले. दिलीप शेलार यांनी आभार मानले.

विरोधकांकडे फक्त शिव्याशाप देण्याचे भांडवल आहे.व्यक्तिगत पातळीवर टिकेचा हल्ला होत असला तरी कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मी डगमगून जाणार नाही.

- शंकरराव गडाख, माजी जलसंधारण मंत्री

भुलथापा आणि मतलबी राजकारणात आम्ही आयुष्याचे अनेक दिवस वाया घातले. आजच्या प्रवेशाने आम्ही विकासकामांशी जोडलो गेल्याचा आनंद आहे.गडाखांचे हात बळकट केले जातील.

- नवनाथ पठाडे, शिवसेना प्रवेश केलेला कार्यकर्ता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT