Raju Shetty, Bhagat singh Koshyari
Raju Shetty, Bhagat singh Koshyari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त आमदार यादीतून नाव वगळा; शेट्टींची राज्यपालांकडे मागणी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या यादीत स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांचे नाव असेल तर ते वगळावे, अशी मागणी स्वतः राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळासह राजभवनात जाऊन राज्यपालांकडे केली आहे. यावेळी राज्यपालांशी श्री. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व राज्यातील चालू राजकिय घडामोडींवर विस्तृत चर्चा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी स्वाभिमानीच्या शिष्टमंडळासह जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. यावेळी श्री. शेट्टी यांनी राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 राज्यपाल नियुक्त जागांच्या यादीत राजू शेट्टी यांचे नाव असेल तर, ते वगळावे, अशी मागणी स्वतः शेट्टी यांनी राज्यपालांकडे केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीशी फारकत घेतल्यानंतर त्याच सरकारच्या शिफारसीवरून आमदारकी घेणे हे आमच्या नैतिकतेत बसत नाही, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. यावेळी श्री. शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर राज्यपालांशी विस्तृत चर्चा केली. यावेळी रविकांत तुपकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT