Fake CM Rural Development App Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News:' मुख्यमंत्री ग्रामीण विकास अँप'मुळे अधिकारी, सामान्यांची तारांबळ; काय आहे प्रकरण

Fake CM Rural Development App: राज्यभरातील सरकारी नोकरदारांच्या ग्रुपवर हा मॅसेज फिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. त्यातच बॅंकाना सार्वजनिक सुटी असल्याने मोबाईल हॅक झालेल्यांमध्ये अस्वस्थता आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News:राज्य सरकारकडून अनेक नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. या सर्वसामान्य जनतेसमोर पोहोचण्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो. त्याची संधी साधत अनेक हॅकर्स सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्यासाठी अशा बनावट ॲपच्या लिंक समाज माध्यमांवर व्हायरल करीत आहेत.

त्या माध्यमातून युजरचा ताबा हॅकर्स घेऊन त्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार आता मुख्यमंत्री ग्रामीण विकास बनावट ॲपची लिंक आल्यानंतर तारांबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांच्या मोबाईलवर आज ‘मुख्यमंत्री ग्रामीण विकास योजना एपीके’ फाईल व्हॉटस्ॲपद्वारे आली.

ही फाईल उघडताच अनेकांचा मोबाईल हॅक होऊन त्याचा ताबा हॅकर्सच्या हाती गेला. राज्यभरातील सरकारी नोकरदारांच्या ग्रुपवर हा मॅसेज फिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. त्यातच बॅंकाना सार्वजनिक सुटी असल्याने मोबाईल हॅक झालेल्यांमध्ये अस्वस्थता आहे. सायबर पोलीस ठाण्यातही याबाबत माहिती विचारण्यासाठी फोन खणखणत होता.

बुधवारी सकाळी काहींच्या मोबाईलवर ‘मुख्यमंत्री ग्रामीण विकास योजना एपीके’ ही फाईल आली होती. सध्या एपीके स्कॅमचा प्रकार सुरू असून, ही लिंक उघडताच तुमच्या मोबाईलचा ताबा समोरच्या हॅकरच्या हाती लागतो. याद्वारे तो वेगवेगळी माहिती, ओटीपी जाणून घेऊन तुमच्या बॅंक खात्यावर डल्ला मारू शकतो.

कोल्हापुरात अशाच एका नोकरदाराला मॅसेज आला. त्यांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईनवर ऑनलाईन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण, समाधानकारक मदत मिळू शकली नाही. त्यातच बॅंकेला सुटी असल्याने बॅंक खात्यातील रक्कम गोठवण्यातही अडथळे आले. त्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर दिवसभरात अनेकांसोबत हाच प्रकार झाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT