Phaltan fake dairy scam news AI Generated Image
पश्चिम महाराष्ट्र

Dairy fraud : गोठ्यात गायी नाहीत, तरी तयार होत होतं शेकडो लीटर दूध; साताऱ्यात FDA च्या छाप्यात बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश

Milk adulteration case in Satara district : फलटणमध्ये बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गोठ्यात एकही गाय नसतानाही दूध उत्पादन सुरू असल्याचे उघड झाल्याने अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Rashmi Mane

Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत बनावट दूध निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही कारवाई केली, त्या गोठ्यात प्रत्यक्षात गायी नसतानाही दूध तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नीरा नदीकाठच्या होळ गावातील संशयित गोठ्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान केमिकलच्या साहाय्याने बनावट दूध तयार केल्याचा प्रकार समोर आला. रोजचे किमान 30 ते 35 लिटर असे दूध इथे तयार होत असल्याची माहिती आहे. पथकाने संशयास्पद साहित्य जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर फलटण तालुक्यात अशा प्रकारचे बनावट दूध तयार करणारे जाळे कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. नागरिकांच्या मते, ही कारवाई केवळ सुरुवात असून अशा अनेक ठिकाणी अजूनही केमिकलयुक्त दूध तयार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ कारवायांवर न थांबता संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक धडक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

केमिकलपासून तयार केलेले दूध जर सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचत असेल, तर हा केवळ भेसळीचा नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यातील इतर संशयित ठिकाणांवरही धडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT