Farmer
Farmer Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्यात पुन्हा शेतकऱ्यांचा संप? : पुणतांब्यात सोमवारी ठरणार व्यूहरचना

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - राज्यात देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले होते. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरले होते. या आंदोलनाचा पाया अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी घातला होता. आता पुन्हा पुणतांब्यात शेतकरी जमले. त्यांनी शेतमालाला भाव मिळत नसल्याने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. ( Farmers strike again in the state? : Strategy to be decided on Monday at Puntambe )

राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. तर दुसरीकडे कांद्याचे दर घटले आहेत. कांद्यापेक्षा बारदाने महाग अशी स्थिती आहे. फळपिकांनाही भाव नाही अशातच मौन्सून पूर्व पाऊस येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 2017साली राज्यात शेतकरी संप झाला होता. हा संप पुणतांबे या गावातून सुरू झाला होता. आता पुन्हा शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुणतांबे ग्रामपंचायती समोर किसान क्रांतीचे पदाधिकारी, शेतकरी नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच शेतकरी यांची संयुक्त बैठक आज झाली.

या बैठकीत 23 मे रोजी पुणतांबे ग्रामपंचायतील विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. या ग्रामपंचायतील पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन कसे होणार हे निश्चित होणार आहे. राज्य सरकारने शिल्लक उसाला एकरी दोन लाख रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना सौरपंपासाठी अनुदान द्यावे, दिवसा वीज द्यावी, केंद्र व राज्य सरकारने आयात निर्यातीचे धोरण ठरवावे, कांद्याला हमीभाव मिळावा, मागेल त्याला खते उपलब्ध व्हावीत, कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी, दुधाला प्रतिलीटर दराचा प्रश्न सोडवावा, नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जावा, उसा प्रमाणे दुधालाही एफआरपी लागू करावी, विहिरीसाठी पाच एकराची अट रद्द करावी, गव्हाची निर्यात सुरू करावी आदी मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT