FIR agianst NCP leader Vidya Lolage Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या विद्या लोलगेंचा प्रताप; घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री उघड

घरगुती गॅस व्यावसायिक वापरासाठीच्या टाक्यांमध्ये भरून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : शहरातील सिध्देश्वर नगरमध्ये घरगुती गॅस व्यावसायिक वापरासाठीच्या टाक्यांमध्ये भरून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी विद्या लोलगे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (NCP Latest Marathi News)

सोलापूर पोलिसांनी विक्रीसाठी ठेवलेल्या ७९ गॅसच्या टाक्या जप्त केल्या आहेत. तर जाकीर अब्दुल सत्तार सय्यद यास अटक करण्यात आली आहे. शहरातील मंगल भांडारच्या बाजूला बेकायदा गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने धाड टाकून टाक्या जप्त केल्या. (FIR agianst Solapur NCP leader Vidya Lolage)

पत्र्याच्या शेडमध्ये एलपीजी गॅसने भरलेले ४० सिलिंडर तर ३९ रिकामे सिलिंडर आढळून आले. व्यावसायिक सिलिंडरमध्ये इलेक्ट्रिक मोटारच्या सहायाने घरगुती गॅस भरला जात असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इण्डेन कंपनीच्या ७९ टाक्या जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी गॅसच्या टाक्यांसह नोझल स्वीच, इलेक्ट्रिक बोर्ड, काळ्या रंगाची २० फूट वायर, आयकॉन कंपनीचा इलेक्ट्रिक वजन काटा, रिक्षाचे जुने टायर असा एकूण एक लाख ३८ हजार २७२ असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी विद्या लोलगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT