Sangli Urban Bank
Sangli Urban Bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ? : सांगली अर्बन बॅंकेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल

सरकारनामा ब्यूरो

सांगली : सांगली (sangli) अर्बन बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस आहे. एस.टी. गटातून विद्यमान संचालक अरविंद कोरडे यांनी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. २६ मे) पर्यंत आहे. (First candidature application filed for Sangli Urban Bank)

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकार उपनिबंधक निळकंठ करे काम पाहत आहेत. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल चव्हाण काम करीत आहेत. संचालकांच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. तीन दिवसात ८० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून बुधवारी (ता. २५) मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

सांगली अर्बन बँकेचे ६० हजार सभासद असले तरी मृत्य झालेल्या सभासदांची संख्या जास्त आहे. गेल्या निवडणुकीत केवळ २६ हजार मतदान झाले होते. यंदाही याच दरम्यान मतदान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सांगली अर्बन बॅंकेसाठी यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. गेल्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी यांच्याकडून गणेश गाडगीळ यांनी सत्ता मिळवली होती. यंदाच्या निवडणुकीतही पुजारी गटाचे प्रमोद पुजारी यांनी विद्यमान अध्यक्षांवर मनमानी पद्धतीने कारभाराची टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना बिनविरोधचे प्रयत्न असले, तरी विरोधकांकडे कसा प्रस्ताव जातोय, याकडे नजर होती. सत्ताधारी गटाच्या तडजोडीला विरोधकांनी नापसंती व्यक्त केली असून त्यांनी निवडणूकीची तयारी सुरु केल्याची माहिती आहे.

निवडणूक कार्यक्रम

सांगली अर्बन बॅंकेसाठी २६ मे अखेर अर्ज दाखल करता येतील. ३० मे ते १३ जून या कालावधीत उमेदरावारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. गरज भासल्यास २६ जूनला मतदान होणार आहे. प्रत्यक्ष प्रचारासाठी १२ दिवसाचा कालावधी मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT