Maratha Reservation Resignation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation Resignation : मराठा आरक्षणासाठी दिलेला पहिला राजीनामा मंजूर; नगरमधून शिंदे गटाच्या...

Maratha Reservation Resignation : राज्यात दिलेल्या राजीनामांपैकी राज्यातला मंजूर झालेला पहिला हा राजीनामा आहे.

Chetan Zadpe

Maratha Reservation Resignation : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरमधील कार्यकर्ते मदन आढाव यांनी दिलेल्या आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी राज्यात दिलेल्या राजीनामांपैकी राज्यातला मंजूर झालेला हा पहिला राजीनामा आहे. (Latest Marathi News)

नगर महापालिकेचे नगरसेवक मदन आढाव यांनी मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत म्हणून आयुक्त पंकज जावळे यांची भेट घेऊन राजीनामापत्र दिले होते. तसेच शिवसेना पक्षाचाही राजीनामा दिला होता. महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार हा राजीनामा स्वीकारला आहे. आयुक्तांनी मदन आढाव यांचा राजीनामा पत्र स्वीकारल्यानंतर नगरसचिव कार्यालय, महापौर रोहिणी शेंडगे, संगणक विभाग, मुख्य लेखा अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक यांना राजीनामा पत्र स्वीकारल्याची माहिती दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे राज्यात विशेषतः मराठवाड्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, राजकीय पक्षांचे संपर्क कार्यालय निवासस्थाने जाळण्यात आले आहेत. एसटी महामंडळाची बसदेखील येथे टार्गेट झाली आहे.

सकल मराठा समाजाचा रोष सर्वाधिक मंत्री, खासदार, आमदार यांच्यावर आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू लावून धरत खासदार, आमदार, नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यात मदन आढाव यांनीही त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. तो महापालिका आयुक्तांनी स्वीकारला आहे. मदन आढाव हे शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT