Shahaji Bapu Patil| Aditya Thackeray| 
पश्चिम महाराष्ट्र

आधी तुम्ही राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवा; शहाजीबापूंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

Shahaji Bapu Patil| Aditya Thackeray| आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही राजीनामे देणार नाही.

सरकारनामा ब्युरो

सांगोला: 'शिवसेनेचे चाळीस आमदार एकत्रित असल्याने आमचं बहुमत आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, उलट बहुमत गमावलेल्या आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित 15 -16 आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येवून दाखवावे,' असा पलटवार सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केला आहे.

शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमची असल्याचे सांगण्यासाठी राज्यभरात शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. यात्रेच्या माध्यमातून बंडखोर 40 आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली, असा आरोप करत, आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. ठाकरे यांच्या आव्हानाला उत्तर देत, आमदार शहाजी पाटील यांनी प्रतिआव्हान दिले आहे. "आधी तु्म्ही राजीनामा देऊन पुन्हा निवडून येवून दाखवा, असे खुले आव्हान शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे दररोज सकाळी होणारी किरकिर आता बंद झाली आहे. त्यामुऴे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण शांतपणे चालू राहील, असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. संजय राऊत यांचे हात स्वच्छ असते तर त्यांना अटक झाली नसती, काही तरी काळं बेरं असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना अटक झाली, असे सांगत त्यांनी राऊतांच्या अटकेचे समर्थनही केले.

''आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही राजीनामे देणार नाही. तुम्हीच पंधरा सोळा जण उरलेले आहात. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्यासह उर्वरित आमदारांनी राजीनामे द्यावेत. तुमची आमदारकी शाबूत ठेवणार आणि आमच्या मागे लागणार का, असा सवालही आमदार पाटील यांनी उद्धव व आदित्य ठाकरे यांना उद्देशून केला. कायद्याची पुस्तकं वाचा जरा, असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी मोठं काम केलं. इतिहासदेखील एक दिवस हे मान्य करेल. महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. त्यांचं पटलं नसतं, तर त्यांच्या सभेला कोणी काम धंदा सोडून आले नसते. संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा दावाही आमदार पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT