mantralaya, mumbai
mantralaya, mumbai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्रालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने पाच लाखांचा गंडा

सचिन शिंदे

कऱ्हाड ः मंत्रालयात नोकरीला लावतो म्हणून दोघांची पाच लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कराडमध्ये उघडकीस आला आहे. त्याबाबत कराड तालुका पोलिसांत कोल्हापूर जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश जगन्नाथ पवार (रा. चचेगांव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंमतराव बाळू निंबाळकर (रा. मोगरायाचीवाडी, ता. हातकणंगले) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ओंकार माळी व प्रथमेश हर्षे यांची फसवणूक झाली आहे.

कराड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश पवार व संशयित हिंमतराव निंबाळकर यांची ओळख झाली, त्यावेळी निंबाळकरने मंत्रालयात नोकरीला आहे, असे सांगितले होते. काही दिवसांनी निंबाळकरने मंत्रालयात सहा जागा भरायच्या आहेत, असे पवार यांना सांगितले. त्यावेळी पवार यांनी आमच्यातील दोघांना नोकरी लावायची आहे, असे निंबाळकरला सांगितले. त्यानंतर निंबाळकरने त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून एका उमेदवारासाठी अडीच लाख रुपये भरायचे आहेत, असे सांगितले.

त्यानुसार पवार याने निंबाळकर यांच्या सांगण्यावरून सात जुलै 2021 रोजी मीना कांतीलाल नगारे यांच्या बँक खात्यावर 50 हजार रुपये भरले. त्याच दिवशी महेश हर्षे याच्या बँक खात्यावरून महेश प्रजापती यांच्या खात्यावर 50 हजार रुपये व प्रथमेश हर्षे यांच्या बँक खात्यातून मीना नगारेच्या बँक खात्यावर 50 हजार भरले. त्यानंतर ओंकार माळी व प्रथमेश हर्षे यांना कामास लावण्यासाठी तीन लाख पन्नास हजार रुपये रोख निंबाळकर याच्याकडे दिले.

दोघांना नोकरी लावण्यासाठी निंबाळकरला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर निंबाळकर याने पवार व अन्य कोणाचेच कॉल घेत नव्हता. त्याचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे पवार यांनी मंत्रालयात जाऊन खात्री केली. तेथे निंबाळकर नावाची व्यक्ती मंत्रालयात नोकरीस नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी निंबाळकरच्या विरोधात तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT