कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांनी आज पदभार स्वीकारला. व्याघ्र प्रकल्पाचे पूर्वीचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण आज निवृत्त झाले आहेत. त्यांच्या कडून वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक म्हणून नानासाहेब लडकत यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला. श्री. लडकत पुण्यातून सायकलवरून येऊन कोल्हापूरला हजर झाले.
विशेष म्हणजे वनसंरक्षक नानासाहेब लडकत भारतीय वन सेवेतील उच्च दर्जाचे अधिकारी आहेत. सहायक विभागीय आयुक्त दर्जाचे हे पद आहे. दारात सरकारी लाल दिव्याची गाडी आहे, पण, त्यांना सायकल चालवण्याची आवड आहे, म्हणूनच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी ते पुण्याहून सायकल चालवत कोल्हापूर येथे पोचले. निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करा हा संदेश देत ते सायकल वरून कोल्हापूरला पोहचले. त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
श्री. लडकत महाराष्ट्र वनसेवेत १९८६-८७ पासून आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कामाची सुरवात केली , तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ही ते सहायक वनसंरक्षक पदी होते. भारतीय वन सेवेत २००६ मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कोअरचे उपसंचालक म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. तर कोल्हापूरला पदभार स्वीकारण्या पूर्वी ते पुणे येथे वनसंरक्षक कार्य व आयोजना येथे कार्यरत होते. त्यांचे कोईमतुर येथे वन्यजीव प्रशिक्षण व भारतीय वन्यजीव संस्था ढेराडून येथे वन्यजीव व्यवस्थापनचा पदव्युतर डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.