Balasaheb Patil, Udayanraje Bhosale
Balasaheb Patil, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वैरत्व विसरून उदयनराजे, बाळासाहेब पाटील यांची बंद खोलीत चर्चा...

Umesh Bambare-Patil

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale व सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांचे वैरत्व सर्वाना माहिती आहे. मात्र, आज अचानक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये Satara Collector office दोन्ही नेत्यांची भेट होताच या दोघांनी एकमेकांना नमस्कार करत काही काळ बंद खोलीत चर्चा केली. मात्र, या चर्चेत कोणत्या राजकीय विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही.

खासदार उदयनराजे व सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकीय वैरत्व पाहायला मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षापूर्वी झालेला जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये हे दोघे एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे ठाकले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये राजकीय वैरत्व निर्माण झाले आहे.

मात्र, तरीदेखील त्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेले स्मितहास्य पाहून दोन्ही नेत्यांचे वैरत्व संपुष्टात आले का, अशी चर्चा देखील आता सातारच्या राजकारणात होऊ लागली आहे. बंद खोलीत झालेल्या चर्चेमध्ये कोणती मोठी राजकीय चर्चा झाली का आणि त्याच्यातून राज्यातील राजकारणामध्ये कोणती मोठी राजकीय घडामोड घडू शकते का, या चर्चेला आता उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT