Hasan Mushriff, Balasaheb Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : माजी सहकारमंत्र्यांकडुन हसन मुश्रीफांची पाठराखण...

Balasaheb Patil बाळासाहेब पाटील म्हणाले, एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे, आरोप मोठा करुन त्याला समाजातून उठवायचे अशा पद्धतीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे.

हेमंत पवार

Karad News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ Hassan Mushrif यांच्या घरावर, ऑफिसवर ईडीने छापा टाकला. परंतू गेल्या काही दिवसापूर्वी इन्कम टॅक्सने छापा टाकला होता. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरही ईडीने कारवाई केली. मात्र, ते बाहेर आले. मुश्रीफ त्याला कायदेशीर मार्गाने उत्तर देतील. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे, मोठा आरोप करुन त्याला समाजातून उठवायचे अशा पद्धतीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे, अशी टीका माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी केली आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचे, आरोप मोठा करुन त्याला समाजातून उठवायचे अशा पद्धतीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. देशात काही लोकांच्या सांगण्यावरून केंद्र व राज्यातील यंत्रणा काम करत आहेत. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालणार नसुन ते लोकशाहीच्या दृष्टीने मारक आहे.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपाल टीका करत आहेत. महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्याबाबतीत एका मंत्री भिक मागुन शिक्षण दिले, असे म्हणाले. एका मंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्याबद्दल भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. केवळ महापुरुषांचा अपमान करण्याचे काम सुरु आहे.

प्रादेशिक असमतोल वाढत चालला आहे. व्देषावर आधारीत काम सुरु आहे. आरोप मोठा करायचा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करायची असे सत्र सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम त्यांच्याकडु सुरु आहे. अधिवेशनात आम्ही त्याविरोधात आवाज उठवला. विधानसभेत प्रश्न विचारला तर दम दिला जातो. विदर्भाच्या दबावामुळे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत घ्यावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT