Shankarao Gadakh News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shankarao Gadakh News : नगरमधील राजकारण तापलं; अखेर माजी मंत्री गडाखांच्या ताब्यातील दुध संघ बंदचा निर्णय

Dudh Sangh : सोनई (अहमदनगर) माजी मंत्री शंकरराव गडाख यांची राजकीय कोंडी झाली आहे.

विनायक दरंदले

Ahmednagar News : सोनई (अहमदनगर) माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांची राजकीय कोंडी झाली आहे. नेवासे तालुका दुध संघ बंद करुन दुध संकलन थांबविण्यात आले आहे. नाईलाजाने घेतलेल्या निर्णयाने दुध उत्पादक व कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गडाख यांच्या ताब्यातील संस्थेने दहा वर्षापुर्वी वीजचोरी केल्याचा करण्यात आला आहे. प्रशांत गडाख पाटील यांच्यासह अठरा संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसापुर्वी न्यायालयाचा आदेश झुगारून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दूध संघाचा वीज पूरवठा तोडून टाकला. त्यामुळे रोज हजारो लिटर दुधाचे नुकसान होवू लागल्याने संघ बंद करण्यात आला.

आमदार गडाख यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षाबरोबर राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याने त्यांच्या मुळा साखर कारखाना व मुळा एज्युकेशनला अडचणीत आणले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील राजकारण पेटले आहे. दुध संघावर सातत्याने सुरू असलेल्या कारवाया आणि वीजचोरीच्या आरोपांमुळे संस्था बंदचा निर्णय घेण्यात आला.

येथील बेरोजगार कर्मचाऱ्यांचा प्रश्न आमदार गडाख मार्गी लावतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष गणपत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या दुध संघाच्या माध्यमातून नेवासे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र, या राजकारणात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील राजकीय विरोधकांनी दुध संघाच्या कारवाईत हस्तक्षेप केल्याचा आरोप जेष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) व आमदार गडाख यांनी सोनईतील मेळाव्यात केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT