Amal Mahadik News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amal Mahadik Leading: अटीतटीच्या लढतीत माजी आमदार अमल महाडिकांची मोठी आघाडी

Kolhapur News : पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गटाने आघाडी घेतली.

सरकारनामा ब्यूरो

Rajaram Sugar Factory Election Result : कोल्हापुरातील (Kolhapur) अटितटीच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना ( Chhtrapati Rajaram Sugar Factory Election Result) निवडणुकीची मतमोजणी कोल्हापूरमधील रमणमळा शासकीय गोदामात सुरु आहे. यामध्ये पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. त्यामध्ये महाडिकांनी आघाडी घेतली आहे. महाडिक गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक () यांनीही मोठी आघाडी घेतली आहे.

पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गटाने आघाडी घेतली. दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 मतांनी आघाडीवर आहेत. तर माजी आमदार अमल महाडिक हे 1 हजार मतांनी आघाडीवर आहेत. महाडिक गटाचे उमेदवार शिवाजी रामा पाटील यांना 3 हजार 198 मते पडली आहेत. सर्जेराव बाबुराव भंडारे यांना 3 हजार 173 मते मिळाली आहेत. तर अमल महादेवराव महाडिक यांना 3 हजार 358 मते मिळाली आहेत.

अमल महाडिक यांनी तब्बल हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर विरोधी सतेज पाटील (Satej Patil) गटातील उमेदवार शिवाजी ज्ञानू किबिले यांना 2 हजार 261 तर दिलीप गणपतराव पाटील यांना 2 हजार 328 आणि अभिजीत सर्जेराव माने यांना 2 हजार 184 मते मिळाली आहेत.

गट क्रमांक 1 मधील पहिल्या फेरीत सतेज पाटील पॅनेलचे उमेदवार बेनाडे शालन बाबुराव (रुई) यांना 2 हजार 441 मते तर भोसले किरण बाबासो (रूकडी) यांना 2 हजार 413 मते मिळाली आहेत. तर सत्ताधारी महाडिक पॅनेलचे भोसले विजय वसंत यांना 3 हजार 244 आणि मगदूम संजय बाळगोंडा यांना 3 हजार 169 मते मिळाली आहेत.

पहिल्या फेरीत १ ते २९ मतदान केंद्र व दुसऱ्या फेरीत ३० ते ५८ केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. एकूण २९ टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. प्रत्येक टेबलावर ४ अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण १५० कर्मचारी मतमोजणीसाठी आहेत. अमल महाडिक यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT