Bhanudas Murkute
Bhanudas Murkute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माजी आमदार भानुदास मुरकुटे लागले लोकसभेच्या तयारीला

गौरव साळुंके

श्रीरामपूर ( अहमदनगर ) : श्रीरामपूर नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची गणिते डोळ्या समोर ठेवून राजकीय खेळ्या सुरू झाल्या आहेत. यातच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी नवीनच डाव खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याची चर्चा आज अहमदनगर जिल्ह्यात आहे. Former MLA Murkute preparing for Lok Sabha

श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्याच्या यंदाच्या गाळप हंगामाच्या प्रारंभ सोहळ्यात मंगळवारी (ता. 26) सायंकाळी मुरकुटे यांनी हे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते शरद पवार यांची नुकतीच भेट घेऊन अहमदनगर जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी करण्याची तयारी दर्शविल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

मुरकुटे म्हणाले, जेष्ठनेते शरद पवार यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आपण व्यक्त केली. अहमदनगरमधून निवडणुकीची आपली तयारी आहेत. त्यासाठी पक्षाने वयाचा कुठलाही निकष लावला, तरीही काळजी करु नये, असे त्यांना सांगितले. कारण वयाच्या 80 व्या वर्षी देखील आपण तंदुरुस्त आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुण उमेदवारांसोबत दोन किलोमीटर अंतर चालविण्याची स्पर्धा घ्यावी, त्यात निश्चितच तरुणांपेक्षा आपण सरस ठरणार असल्याने आपली उमेदवारी करण्याची तयारी आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात आपले राजकीय वजन आहे. आमदार नसलो, तरी देखील मंत्रिमंडळातील अनेक सहकारी हे जुने मित्र राहिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जेष्ठनेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहे. त्यामुळे कुठलेही राजकीय कामास अडचण येत नसल्याचे मुरकुटे यांनी स्पष्ट केले.

कर्डिलेंशी कुस्ती

माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भंडारदरा परिसरात मैत्री पूर्ण कुस्ती खेळलेल्याचा फोटो व्हायरल झाला होता. राजकीय डाव मुरकुटे खेळू पाहत असल्याची चर्चा आज जिल्हाभर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT