Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नेवाशात माजी आमदार मुरकुटेंनी केले गडाखांचे तोंडभरून कौतुक

सरकारनामा ब्युरो

विनायक दरंदले

Shankarrao Gadakh : सोनई ( जि. अहमदनगर ) - माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी मंत्री पदाला खऱ्या अर्थाने न्याय देत तालुक्याच्या विकासाला गती दिली. अशी किमया करणाऱ्या नेतृत्वाला जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात उज्वल भविष्य आहे, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले.

बेलपिंपळगाव ( ता. नेवासे ) सेवासंस्थेच्या 81 लाख रुपये खर्चाच्या व्यापारी संकुलचे भूमिपूजन नंतर झालेल्या कार्यक्रमात मुरकुटे बोलत होते. अध्यक्षस्थानी वसंत भद्रे होते. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, संजय सरोदे महाराज, उत्तम अंधारे महाराज, वैद्यनाथ पाटील महाराज, ज्ञानेश्वर काळे, दिगंबर शिंदे, ज्ञानेश्वर पटारे, सेवा संस्था अध्यक्ष बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. वसंत रोटे, रवी सरोदे, रमेश सरोदे, कार्ल्स साठे यांचे भाषण झाले.

प्रास्तविक सखाहरी शिंदे यांनी केले. प्रमुख भाषणात मुरकुटे यांनी दिलेला शब्द कसा पाळावा हे गडाखांकडून शिकण्यासारखे आहे असे सांगून नेवासे तालुक्याला कर्तृत्ववान नेतृत्व मिळाल्याने अशा कामाच्या माणसाला येणाऱ्या सर्व निवडणुकीत सर्वांनी पाठबळ देवून कामदारपणा अधिक विकसित करावा असे आवाहन उपस्थितांना केले.

मिळालेले मंत्रिपद तालुक्याच्या विकासासाठीच पणाला लावले.बेलपिंपळगाव येथील रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी दिला व घोगरगाव वीज उपकेंद्राचे काम मार्गी लावले असे सांगून माजी मंत्री गडाख यांनी 19 कोटी 27 लाखांचा निधी दहा गावच्या पाणी योजनेला दिला असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जैनपूर, बेलपांढरी, सुरेगाव, भालगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरकुटे उवाच..

भाषणबाजी करताना माजी आमदार भानुदास मुरकुटे चिमटे आणि टोमणा मारण्यात पटाईत असले तरी येथील कार्यक्रमात त्यांनी व्यायामशाळा, रस्ते व जलसंधारण कामाचे तोंड भरून कौतुक केले. मी आणि अशोक परिवार तुमच्या पाठिशी असल्याचा विश्वास त्यांनी गडाखांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT