Nasayya Adam
Nasayya Adam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Old Pension Scheme : सोलापुरातील माजी आमदार आडमांनी दिला जुन्या पेन्शन योजनेच्या लढ्यासाठी एक लाखाचा निधी

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर (Nasayya Adam) यांनी आपल्या माजी आमदार पेन्शनमधून १ लाख १ रुपये रुपयांचा निधी जुन्या पेन्शन योजनेच्या लढ्यासाठी दिले आहेत. तसेच, आपल्या राज्यातील कोट्यधीश माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन रद्द करा. मात्र, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी आज सोलापुरात (Solapur) केली. (Former MLA Nasayya Adam gave a fund of one lakh for fight against the old pension scheme)

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आडम यांनी गुरुवारी (ता. १६ मार्च) एक लाख रुपयांची देणगी आंदोलककर्त्यांकडे सुपूर्द केली आहे. त्यावेळी माजी आमदार आडम बोलत होते.

शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी (ता. १६ मार्च) जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला नरसय्या आडम यांनी पांठिबा दिली असून आंदोलनाच्या खर्चासाठी एक लाख रुपयांची देणगी त्यांनी स्वत:च्या पेन्शनमधून दिली आहे.

आडम म्हणाले की, राज्यात ७७५ माजी आमदार आहेत. त्या करोडपती आमदारांना व वारसदारांना मिळणारी पेन्शन रद्द करण्यात यावी. आज आमदारांना सर्व भत्ते मिळून महिन्याला अडीच लाख रुपये मिळतात. सर्व सरकारी सवलती बंद करून आमदारांना मिळणारे वेतन पन्नास टक्के केल्यास त्यातून वाचलेल्या रकमेतून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे सहज शक्य आहे. माजी आमदारांची पेन्शन रद्द करा; मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या, अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT