Prabhakar Gharge
Prabhakar Gharge Mayani Reporter
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अखेर वर्षभराने जामीन....

संजय जगताप

मायणी (ता. खटाव) : पडळ (ता. खटाव) येथील साखर कारखान्यावर सुमारे वर्षभरापूर्वी (११ मार्च) झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अखेर न्यायालयाचा जामीन मिळाला आहे. त्यांनी न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढून ती जिंकली होती.

माण-खटाव ॲग्रो प्रोसेसिंग या साखर कारखान्याचे केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात (रा. गोवारे ता. कऱ्हाड) यांच्या मृत्यूप्रकरणी वडूज पोलिसांत एकूण वीस जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी सात ते आठ आरोपींना वडूज पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादीचे खटावचे नेते व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याही नावाचा समावेश होता. श्री. घार्गे यांनी उच्च न्यायालयात प्रकृतीचे कारण देत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी झाली होती.

या प्रकरणात जामिनासाठी सत्र, जिल्हा, उच्च न्यायालयाची दारे श्री. घार्गे यांनी ठोठावली होती. मात्र, जामीन नाकारण्यात आला. त्यांनी सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातूनच लढली होती. त्यामध्ये ते सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले होते. अखेर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घार्गे यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, जामीन मिळाल्याचे वृत्त संपूर्ण जिल्हाभर वाऱ्यांसारखे पसरले आणि खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील श्री. घार्गे यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT