सोलापूर : सोलापुरातील (solapur) युवा सेनेच्या (yuva Sena) मेळाव्यात शिवसेनेचे (shivsena) संपर्कप्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला, तर दुसरीकडे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यास आलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना खुद्द शिवसैनिकांकडूनच मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Former Shiv Sena district chief Laxmikant Thonge-Patil beaten by Shiv Sainiks)
या मारहाणीबद्दल पोलिसांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, त्यांचे वाहन रस्ता दाखवण्यासाठी क्रमांक एकवर होते. हुतात्मा स्मृती मंदिरासमोर सर्व वाहनांचा ताफा आल्यानंतर कोणाची गाडी पुढे व कोणाची मागे यावरून इतर कार्यकत्यांमध्ये बाचाबची झाली. यातूनच तीन-चार तरुणांनी लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील सभागृहात येत असताना त्यांना मारहाण केली. या भांडणानंतर मोठ्या प्रमाण पोलिस बंदोबस्त वाढविण्यत आला.
वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिरात आज (ता. २८ मार्च) युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यासाठी जिल्हाभरातील युवा सेनेच्या कार्यकर्त्याबरोबरच शिवसैनिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शिवसेनेत अगोदरच मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे. या मेळाव्यावेळीच ती नेमकी उफाळली. त्यातूनच ठोंगे पाटील यांना मारहण झाली आहे.
युवा सेनेच्या मेळाव्यासाठी माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील हे आज सकाळी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आले हेाते. त्यावेळी पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण खुद्द शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेमुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
मेळाव्यात तानाजी सावंत काँग्रेस-राष्ट्रवादीवर बरसले
आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज आहोत. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये, असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादाला लागू नका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल, असा इशारा शिवसेनेचे माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायत सदस्यदेखील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊन २५-१५ योजनेतून एक एक, दीड दीड कोटी रुपयांची कामे आणतो आणि येथे येऊन आमच्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, ते यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना मिळते. आम्हाला केवळ गोड बोललं जात. आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमचीच घडी विस्कटण्याचा प्रयत्न ते करत आहेत, ते आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.