Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाची राजकारणात एन्ट्री?

सरकारनामा ब्यूरो

Sushilkumar Shinde : सोलापूरमध्ये आज सिद्धेश्वर महायात्रेचा महत्वपूर्ण विधी अक्षता सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी काँग्रेस (Congress) नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्वला शिंदे व नातू शिखर पहाडिया यांच्यासह उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया हे पहिल्यांदाच सिद्धेश्वर महायात्रेच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात शिखर पहाडिया यांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांना तीन मुली आहेत. त्यामध्ये प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर शहरमधून आमदार असून त्या राजकारणात सक्रिय आहेत. आता शिखर पहाडिया यांना सिद्धेश्वर यात्रेत सहभागी करत राजकीय दृष्ट्या लाँच करण्याचा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

तसेच सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय वारसदार शिखर पहाडिया हे असल्याची देखील चर्चा सोलापूरमध्ये सुरू झाली आहे. मात्र यावर आता शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, शिखर पहाडिया हे सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांची मोठी मुलगी स्मृती शिंदे यांचे चिंरजीव आहेत. तर यावेळी प्रतिक्रिया देताना पहाडीया म्हणाले, ''मी आता दरवर्षी सिद्धेश्वर महायात्रेला येणार आहे''. मात्र, यावेळी त्यांना राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT