Samadhan Autade-Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha politics : ‘भाजपच्या आमदाराने यूपी, बिहारच्या कामगारांना बनविले मतदार’

Bhagirath Bhalke's allegation on MLA Samdhan Autade : मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथील खासगी कारखान्यात कामाला असलेल्या यूपी, बिहारच्या 129 कर्मचाऱ्यांचा आमदारांनी मतदार यादीत समावेश केला. पण, इथल्या मतदारांनी तो डाव हाणून पाडत निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करून त्यातील 60 मतदार कमी केले आहेत.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 26 September : विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यास आणखी काही दिवसांचा अवधी असतानच मंगळवेढ्याचा राजकीय आखाडा मात्र दिवसेंदिवस तापू लागला आहे. भाजप आमदार समाधान आवताडे हे मतदारसंघात आपण कोट्यधी रुपयांचा विकासनिधी आणल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे, भगीरथ भालके मात्र जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आवताडेंना लक्ष्य करत आहेत. तीन हजार कोटींचा निधी आणल्याचे सांगणाऱ्या भाजप आमदाराला यूपी, बिहारची 129 मते वाढविण्याची काय गरज होती, असा सवाल भालकेंनी केला आहे.

भगीरथ भालके यांची जन आशीर्वाद यात्रा सध्या मंगळवेढा तालुक्यातून मार्गक्रमण करत आहे. या यात्रेच्या माध्यमातून भालके हे आमदार समाधान आवताडे यांच्या दाव्यांची पोलखोल करत आहेत. तसेच, तालुक्यातील खासगी कारखान्यात कामाला असलेल्या कामगारांना मतदार बनविल्याच आरोपही भालके यांनी केला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ येथील खासगी कारखान्यात कामाला असलेल्या यूपी, बिहारच्या 129 कर्मचाऱ्यांचा आमदारांनी मतदार यादीत समावेश केला. पण, इथल्या मतदारांनी तो डाव हाणून पाडत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार करून त्यातील 60 मतदार कमी केले आहेत. उर्वरित 69 मतदान कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असेही भालके यांनी सांगितले.

मी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून विद्यमान लोकप्रतिनिधीच्या तीन हजार कोटी रुपयांच्या निधीचा बुडबुडा 76 गावांत जाऊन फोडला आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातूनच ते माझ्यावर ‘नॉट रिचेबल’चे आरोप करत आहेत. (स्व) भारतनाना भालकेंच्या शिकवणीनुसार मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात मी नसेल तर माझी पत्नी, भाऊ आदींनी हजेरी लावली आहे.

माझ्याविरुद्ध बोलायला कोणतीच गोष्ट नसल्यामुळे ते माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. नॉट रिचेबल कोण आणि रिचेबल कोण, हे येत्या काळात मतदार दाखवून देणार आहेत. हुन्नूर परिसरात मुरुमाच्या खोट्या केसेस शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांनाही गोरगरीब दिसत आहेत. मात्र, धनदांडगे दिसत नाहीत.

विकासनिधीबाबत भारतनानांनी कधीही दुजाभाव केला नाही. मात्र, विद्यमान आमदार निधी देताना आपल्या गटात प्रवेश करण्याची अट घातली जात आहे, असा आरोपही भालकेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT