Madha Aam Sabha-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Aam Sabha : बबनदादांच्या माढ्यात तब्बल 15 वर्षांनी झाली आमसभा; आमदार पाटलांनी 11 तास एकाच खुर्चीत बसून ऐकली जनतेची गाऱ्हाणी

MLA Abhijeet Patil Meeting : माजी आमदार बननराव शिंदे यांच्या कारकिर्दीत 15 वर्षे तालुक्याची आमसभा झाली नव्हती. यापूर्वीच आमसभा तब्बल पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे 2005 मध्ये झाली होती. तसेच ही आमसभा कुर्डूवाडी येथे घेतली जायची. पण, माढ्यातून निवडून आलेल्या अभिजीत पाटील यांनी तालुक्याच्या ठिकाणी आमसभा घेतली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 February : आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माढा विधानसभा मतदारसंघाची तब्बल १५ वर्षांनंतर आमसभा पार पडली. विशेष म्हणजे तालुक्याचे ठिकाण असलेल्या माढा शहरात प्रथमच आमसभा झाली. ही आमसभा तब्बल ११ तास चालली. आमदार अभिजीत पाटील यांनी अकरा तास मंचावरील खुर्चीवर बसून नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.

माजी आमदार बननराव शिंदे यांच्या कारकिर्दीत १५ वर्षे माढा तालुक्याची आमसभा झाली नव्हती. यापूर्वीच आमसभा तब्बल पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये झाली होती. तसेच ही आमसभा कुर्डूवाडी येथे घेतली जायची. पण, माढ्यातून निवडून आलेल्या अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी तालुक्याच्या ठिकाणी आमसभा घेतली.

माढा तालुक्याची (Madha )ही आमसभा सकाळी अकरा ते दहा अशी सुमारे ११ तास चालली. या आमसभेत ३५ हून अधिक विभागांचा आढावा घेण्यात आला. अनेक विभागाच्या विरोधात तक्रारींचा पाऊस पडला. त्यावर सखोल अशी चर्चा या आमसभेत करण्यात आली.

मागील १५ वर्षांपासून पंचायत समितीची आमसभाच झाली नसल्याने समस्यांचे गाऱ्हाणेच माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांना नागरिकांकडून ऐकायला मिळाले. आमदार पाटील यांनी सलग अकरा तास एकाच मंचावरील खुर्चीवर बसून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.

माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आमसभेत तहसीलदारांसह सर्वच विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी करीत खडे बोल सुनावले. पाटील यांनी तहसीलदारांसह सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना जनतेची कामे करा; अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला. माढा मतदारसंघातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचून अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त केला.

ही आमसभा नाममात्र नसून या सभेत कुणाच्या तक्रारींचे निवारण झाले, कुणाचे नाही, या सर्व गोष्टींचे माझ्या कार्यालयात लवकरच उत्तरांच्या आमसभेचे आयोजन करण्यात येईल, त्यावेळी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल, असेही आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेला करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, संजय पाटील, नगराध्यक्षा मीनल साठे, यांच्यासह तहसीलदार, आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी, महावितरण कार्यकारी अभियंता, नगरपालिका मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी, शहर पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्यासह तीसहून अधिक शासकीय विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT