Shivendraraje Bhosale, Piyush Goal sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

Shivendraraje Bhosale शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्ली येथे मंत्री गोयल यांची भेट घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसमोरील अडचणी विषद केल्या.

Umesh Bambare-Patil

Satara News : सहकारी साखर कारखानदारी हा ग्रामीण भागातील अर्थकारणाचा कणा आहे. ऊस पिकामुळे शेतकरी सधन झाला असून शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी सहकारी साखर कारखानदारीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरण राबवावे, अशी मागणी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्री पियुष गोयल Piyush Goal यांच्याकडे केली.

शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्ली येथे मंत्री गोयल यांची भेट घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसमोरील अडचणी विषद केल्या. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सी. ए. शैलेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, महाराष्ट्रात ऊस हे मुख्य पीक असून येथे सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. हे कारखाने सक्षमपणे चालू राहिले पाहिजेत. तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आज सहकारी साखर कारखान्यांपुढे अनेक अडचणी आहेत. त्या प्राधान्याने सोडवणे आवश्यक आहे.

सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालू राहावेत आणि त्यामाध्यमातून शेतकऱ्यांची अधिकाधिक आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ठोस उपाययोजना केंद्र सरकारने राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी श्री. गोयल यांच्याकडे केली.सविस्तर चर्चेनंतर मंत्री गोयल यांनी सहकारी साखर कारखानदारीला उर्जितावस्था मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT