सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेची ज्या रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) गुरुजीमुळे जगाला ओळख झाली, ते येत्या दोन ते तीन दिवसांत राजीनामा देणार आहेत. ग्लोबल टिचर पुरस्काराने डिसले गुरुजींचा जागतिक पातळीवर गौरव झाला होता. आता डिसले गुरुजींनी या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर गंभीर आरोप केले आहेत.
डिसले गुरुजींवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी 11 महिन्यांपूर्वी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार डिसले गुरुजींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, .याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे. तीन वर्षे कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
यावर डिसले गुरुजींनी चौकशी समितीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, माझा रजेचा अर्ज दीड महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आला. मला अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असून, मनस्ताप होत आहे. माझ्याकडे पैशाचीही मागणी करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून रजा न मिळाल्याने माझ्या हातून फुलब्राईट स्कॉलरशिप जाण्याची भीती आहे. या त्रासाला कंटाळून मी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, डिसले गुरुजींनी अमेरिकेत पीएचडी (PHD) करण्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती, त्याला सोलापूर जिल्हा परिषद शिक्षाण विभागाकडून त्रुटी आहेत, असे सांगून नकार देण्यात आला होता. त्यांना पुन्हा मुख्याध्यापकांकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. यावर ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जातं नाही, अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी सध्या नाही, अशी भावना डिसले गुरुजींनी व्यक्त केली होती.
डिसले गुरूजी म्हणाले होते की, काम करण्यासाठी एक विश्वासाचं वातावरण असावं लागतं. मात्र, कामाची दखल न घेता अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे माझ्या संयमालासुद्धा मर्यादा आहेत. आपल्या कामाचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी मी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी नाही. मला अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जायचे आहे. त्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी रजा करण्यात आला होती. मात्र, माझ्या अर्जावर निर्णय घेण्याऐवजी माझ्यावर विविध आरोप केले जात आहे. मला अमेरिकेत जाऊन शिकता आले तर माझ्या शाळेतील व देशातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतु माझ्या प्रामाणिकपणावरच संशय घेतला जात असल्याने माझ्यासमोर राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. (Ranjitsinh Disale News Updates)
दरम्यान, डिसले यांना यांनी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. तर, त्यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आलेत. यामध्ये ते गेल्या तीन वर्षापासून शाळेकडे फिरकले नाही. याबाबत 3 वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला असून, त्यांच्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.