Manohar Ajagavkar while taking darshan of Saturn God Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्रीही शनी दर्शनाला

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 26 फेब्रुवारीला शनिशिंगणापूरला येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ आज गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर सुद्धा शनी दर्शनाला आले होते.

विनायक दरंदले

सोनई (जि. अहमदनगर) - गोवा विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सध्या सुरू आहे. लवकरच निकाल हाती येणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 26 फेब्रुवारीला शनिशिंगणापूरला येऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ आज गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर सुद्धा शनी दर्शनाला आले होते. त्यामुळे भाजपचे गोव्यातील शिर्ष नेते शनीचे दर्शन का घेत आहेत यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी ( ता. 10 ) जाहीर होणार आहे. ( Goa's Chief Minister and Deputy Chief Minister also visited Shani Darshan: Results on March 10 )

उपमुख्यमंत्री आजगावकर त्यांच्या पत्नी मेघा, बंधू डॉ. श्रीकांत व रश्मी राजेंद्र आजगावकर यांनी आज शनिशिंगणापुरला भेट देवून उदासी महाराज मठात शांतीपाठ व संकल्प सोडला. चौथऱ्यावर तेल अभिषेक करुन स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. देवस्थानचे विश्वस्त आप्पासाहेब शेटे व बाळासाहेब बन्सी बोरुडे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सन्मान केला.

आजगावकर म्हणाले, गोवा राज्याच्या निवडणुकीत कुठलीच चुरस नव्हती. भाजपचे काम आणि ध्येयधोरणे लक्षात घेता 10 मार्चच्या निकालात गुलाल आमचाच उडणार, असा विश्वास गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले, गोवा निवडणुकीत भाजपला 17 ते 19 जागा मिळतील. मित्र पक्षासह आमचाच मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असे सांगून त्यांनी इतर पक्षाने खुप लुडबुड करत आरोपांचा भडिमार केला मात्र गोव्यातील जनता सुज्ञ असल्याने आमच्या नव्हे तर विरोधकांच्या झोपा उडाल्या आहेत.

महाराष्ट्रात एकेका मंत्र्यांचा पंचनामा होत असताना महाविकास आघाडी मुग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय तपास यंत्रणा उगाच कुणाला त्रास देत नाही. 'जैसी करणी वैसी भरणी' नुसार महाविकास आघाडीचे मंत्री अडकत आहेत.असे असताना त्यांची चाललेली फुशारकी चुकीची आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT