Gokul Dudh Sangh : Hasan Mushrif Vs Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Chairman Election : मुश्रीफांकडूनही सतेज पाटलांना मैत्रीचा हात? म्हणाले, 'अध्यक्षनिवडीचा फॉर्म्युला द्यावा...', उपरोधिक टोला की प्रस्ताव!

Hasan Mushrif vs Satej Patil : मुश्रीफ यांनी सतेज पाटलांना उपरोधक टोला लगावत म्हटले की, गोकुळच्या अध्यक्ष निवडीबाबत फॉर्म्युला सतेज पाटलांनीच द्यावा.

Roshan More

Gokul News : गोकुळच्या अध्यक्ष निवडीत नवा ट्वि्स्ट आला आहे. सरकारने शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने सतेज पाटलांच्या समविचार आघाडीची सत्ता येण्यास अडसर निर्माण झाली आहे. त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, कोरअचा मुद्दा उपस्थित करत महायुतीने देखील सतेज पाटलांना कोंडीत पकडले आहे. त्यातच आज मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने नव्य चर्चांना उधाण आले आहे.

'गोकुळच्या अध्यक्ष निवडीबाबत नेमके काय करायचे आणि कोणता मार्ग काढायचा, याचा फॉर्म्युला सतेज पाटलांनीच द्यावा', असे मुश्रीफ म्हणाले आहे. त्यामुळे मुश्रीफांनी बोलता बोलता सतेज पाटलांना प्रस्ताव देत मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे. मात्र, हा मैत्रीचा हात नाही तर पाटलांना उपरोधिक टोला असल्याचे बोलले जात आहे.

मुश्रीफ म्हणाले की, गोकुळची निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री, तिन्ही मंत्री आणि १० आमदारांना लक्ष्य करत ज्या प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट लावण्यात आल्या आणि बदनामी केली गेली, ती योग्य नव्हती.

चंद्रकांत पाटलांची भेट

मंत्री मुश्रीफ यांनी आज सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना मुश्रीफ म्हणाले की, जय विजय सर्वांना मिळालेला आहे. पण त्याचा उन्माद असता कामा नये. माझ्या मुलाच्या पराभवाबद्दल त्यांनी जातीयवादी प्रचार केला हेच मनाला लागला आहे.

...तर गोकुळवर संचालक

मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील हा एकमेव दूध संघ आहे. जिथे सभेचा कोरम 14 इतका आहे. नियम पाहिले तर तीन बैठक संचालक अभावी तहकूब झाल्या तर संघावर प्रशासक येतो. जर प्रशासक निवडला तर निवडणूक होऊ शकते. हे रोखायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर शासन नियुक्त संचालक निवडण्याशिवाय आमच्याकडे मार्ग नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT