Gokul Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : 'गोकुळ' बिनविरोध करण्याचे प्रयत्न... पण 'या' दोन बड्या नेत्यांमधील वैर ठरणार सर्वात मोठा अडथळा!

'गोकुळ' निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. मात्र दोन प्रभावशाली नेत्यांतील जुने राजकीय वैर एकमताच्या मार्गात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Rahul Gadkar

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू आणि जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय यड्रावकर यांनी गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार. त्यासाठी मी स्टॅम्पवर लिहून देतो. असा दावा केल्यानंतर दूध उत्पादक आणि सभासदांमध्ये चलबिचल सुरू आहे. मात्र यड्रावकर यांच्या या वक्तव्यामागे अनेक कांगोरे आहेत. जे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे दूध उत्पादक सभासदांसमोर आत्ताचं मांडणी करायची नाही. अन केली तर त्याचा परिणाम सर्वच पुढाऱ्यांना भोगावा लागणार आहे. त्यामुळे नेत्यांनी देखील सावध पावले टाकत रणनीती आखली आहे.

महायुतीमधील अंतर्गत स्पर्धा, शह-कटशहाचे राजकारण, एकमेकांची कुरघोडी, पैशाचा अमाप वापर आणि विरोधक म्हणून तगडे आव्हान आमदार सतेज पाटील यांचे असल्याची जाण झाल्याने गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली आखल्या जात आहेत. पण निवडणूक बिनविरोध होणार का, याबद्दल सामान्य दूध उत्पादकांच्या मनात साशंकता वाटत असली तरी अंतर्गत राजकीय हालचाली काही वेगळ्याच सुरू आहेत. शिवाय सतेज पाटील यांना देखील सोबत घेण्याच्या हालचाली प्राथमिक टप्यात सुरु आहेत.

महायुतीमधील जागा वाटप निश्चित आहे, विरोधी आमदार सतेज पाटील यांना किती जागा द्यायच्या हे देखील निश्चित आहे. दोघांनाही एकत्र आणून निवडणूकच बिनविरोध करायची, हे ठरले आहे. मात्र स्थानिक पातळीवर महायुतीतील नेते एकमेकांवर तुटून पडलेत. याच कारण इच्छुकामध्ये दडले आहे. पण आताच बिनविरोधची चर्चा सुरू केली तर सर्वच पक्षात उमेदवारीवरून गोकुळचे राजकारण हाणामारी पर्यंत पोहोचेल याच भीतीने सर्वांनी मौन बाळगले आहे.

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार विनय कोरे यांचा पुढाकार पहिल्यापासून आहे. निवडणुकीतील पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी आमदार कोरे यांच्यावर सर्व घटकांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ठरावाचा वाढता आकडा पाहून नेते देखील हबकले आहेत. दोन महिन्यापूर्वी पन्नास ते एक लाख रुपये ठराव असणारा दर आता पाच लाखापर्यंत पोहोचला आहे.

बिनविरोधच्या अंतर्गत हालचाली गतिमान झाल्याने कोणत्या पक्षाकडे किती जागा येऊ शकतात, याचा अंदाज सर्वच नेत्यांना आहे. त्यामुळेच आतापासूनच उमेदवारांचे साटेलोटे सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काल परवा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहे असे म्हणणारे स्वतंत्र ठराव दाखल करण्याच्या मानसिकतेत आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी यापूर्वीच स्वतंत्र ठराव दाखल करत निर्णय जाहीर केलेला नाही. तर जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील हे देखील स्वतंत्र ठराव दाखल करणार आहेत. माजी संचालक चेतन नरके आणि अरुण नरके हे देखील स्पष्टपणे सतीश पाटील यांच्यासोबत असणार ही भूमिका देण्याबाबत स्पष्टता नाही.

बिनविरोध होण्यासाठी या गोष्टी ठरणार अडचणीच्या

माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यातील वाद बिनविरोधला अडसर ठरणार अशी शक्यता आहे. मात्र पडद्यामागे सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता एका विशिष्ट वेळेपर्यंत दोघे एकत्र येऊ शकतात. असा अंदाज बांधला जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत एकत्र येणार नाहीत असे देखील एका गटाकडून बोलले जात आहे. शिवाय नरके बंधू यांची देखील समेट घडवून हे देखील आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT