Gokul Dairy President Arun Dongale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : अरुण डोंगळेंची गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीला दांडी : मुंबईवरून परतातच राजीनाम्याचा निर्णय फिरला

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ आज (15 मे) रोजी संपत आहे.

Rahul Gadkar

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच तापलं आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करून डोंगळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली आहे. मुंबईवरून परतातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच आपण राजीनामा देणार नसल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

'सरकारनामा'ने बुधवारी सायंकाळीच या घडामोडीची बातमी दिली होती, त्यावर डोंगळे यांनी आज शिक्कामोर्तब केले. डोंगळे म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच आपण राजीनामा देणार नाही. माझा अध्यक्षपदासाठी आग्रह नाही. मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी दोन्ही नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज राजीनामा देऊ नका अशा सूचना मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच आजच्या संचालक मंडळ बैठकीत माझ्यावर अविश्वास ठराव आणल्यास त्याबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते बघून घेतील. कारण राजीनामा न देण्याबाबत त्यांनीच मला सूचना केल्या आहेत. गोकुळमध्ये आज पर्यंत राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा अदृश्य सहभाग होता. आता तो उघडपणे आहे इतकाच फरक आहे. राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळ सारख्या मोठ्या संस्थेमध्ये काही करता येत नाही. सरकारच्या विरोधात गेल्यास गोकुळला अडचणी येऊ शकतात. म्हणूनच मी महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणार आहे, असेही अरुण डोंगळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT