Kolhapur’s Gokul Dairy announces ₹136 crore bonus for milk producers, ensuring farmers celebrate a prosperous Diwali in 2025. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dairy Bonus 2025 : कोल्हापुरातील दूध उत्पादकांची दिवाळी यंदा दणक्यात साजरी होणार! गोकुळकडून 136 कोटीचा फरक जाहीर

Gokul Dairy Announces Bonus for Milk Producers : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी अर्थात गोकुळ दूध संघाकडून यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी केली जाणार आहे. 2024 ते 2025 या आर्थिक वर्षातील अंतिम दूध फरक नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 30 Sep : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी अर्थात गोकुळ दूध संघाकडून यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी केली जाणार आहे. 2024 ते 2025 या आर्थिक वर्षातील अंतिम दूध फरक नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

यानुसार यंदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना 136 कोटी तीन लाख रुपयांचा फरक मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 22 कोटी 36 लाखांचा अधिकचा फरक शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा गोकुळ दूध संघाने यंदाचा आर्थिक फरक जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदाच्या वर्षी 136 कोटी तीन लाख रुपयांचा उच्चांकी फरक गोकुळ दूध संघाला मिळाला असून 1 ऑक्टोंबर 2025 रोजी जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा फरक मिळणार आहे.

एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत कालावधीत झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुरवठाधारक शेतकऱ्यांना प्रतिलिटर म्हैस दूध उत्पादकांना 2 रुपये 45 पैसे तर गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 1 रुपये 45 पैसे अंतिम दूध फरक दिला जाणार आहे.

तर प्राथमिक दूध संस्थांना प्रतिलेटर सरासरी एक रुपये 25 पैसे डीबेंचर पोटे गोकुळ कडे जमा करण्यात येणार आहे. यंदा गोकुळ दूध संघाकडून हीरक महोत्सवी वर्षानिमित्त म्हैस आणि गाय उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर वीस पैसे जादाचा फरक दिला जाणार असल्याची माहिती देखील गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिला.

दर फरकाची विभागणी खालील प्रमाणे

म्हैस दुधाकरिता 66 कोटी 37 लाख 70 हजार रुपये

गाईच्या दुधाकरिता 45 कोटी 74 लाख 8 हजार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT