Congress MLA Satej Patil met BJP rural district chief Rajvardhan Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीत धक्कादायक घडामोडी! सतेज पाटलांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्षांची भेट; कोल्हापुरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

Satej Patil BJP Meeting : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आपले भेटीगाठीचे दौरे वाढवले आहेत. मंगळवारीही त्यांनी शिरोळ, कवठेगुलंद आणि टाकवडे येथे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बैठकी घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Rahul Gadkar

Kolhapur News, 26 Aug : कोल्हापूर महायुतीमधील वाद सतत या ना त्या कारणाने धुमसत असताना इकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने गाठीभेटी सुरू केल्या आहेत. अशातच त्यांनी काल भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी शिरोळ, कवठेगुलंद आणि टाकवडे येथे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बैठकी घेतल्या. शिवाय गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने आढावा बैठका घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना ही दिल्या.

मात्र या दौऱ्यात सतेज पाटील यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या यड्राव येथे राहत्या घरी जाऊन येथे भेट घेतली. या भेटीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या बैठकीला माजी आमदार राजूबाबा आवळे, दत्त कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, अमोल चौगुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही शिरोळ तालुक्यात बैठक घेतली होती. त्या बैठकीलाही निंबाळकर उपस्थित होते. आता सतेज पाटील यांच्या बैठकीतही निंबाळकर दिसल्याने चर्चाना उधाण आले आहे. यावरून गोकुळमध्ये सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरत असून भाजपची नेमकी भूमिका काय असणार याकडे देखील आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मानस पुत्र समजले जातात. अशा परिस्थितीत निंबाळकर यांची भेट आमदार पाटील यांनी घेतल्यानंतर त्याला आणखीन राजकीय रंग चढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT