Satej Patil latest news : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर चार तज्ज्ञ संचालकांची नेमणूक झाल्याची माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चात दिली. याबाबतचा जीआर दुग्ध विकास खात्याने काढला आहे, मात्र तो अपलोड करण्यात आलेला नाही. असे असले तरी ही नावे आपल्या हाती लागल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सतेज पाटील यांनी चार तज्ज्ञ संचालकांची नावे मोर्चामध्ये जाहीर केली. ते म्हणाले, सरकारने वटहुकूम काढल्यानंतर काल रात्री दुग्धविकास विभागाने जीआर काढला. पण तो अपलोड केलेला नाही. चार नावे त्यांनी स्वीकृत म्हणून पाठविली आहेत. शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील आणि अॅड. प्रशांत पाटोळे ही नावे तज्ज्ञ संचालक म्हणून निश्चित करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
प्रशांत पाटोळे हे सांगली जिल्ह्यातील असून त्यांना तज्ज्ञ संचालक नेमल्याने सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, महायुतीला सांगलीचा माणूस मिळाला, पण जाजम उचलणाऱ्या कार्यकर्त्यांला संधी दिली नाही. कोल्हापुरातील कुणाचे नाव ह्यांना घेता आले नाही. मुश्रीफसाहेबांनी ज्यांना ज्यांना तिकीट दिले त्यातल्या कुणाला न्याय मिळाला नाही. थेट सांगलीचा माणूस गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून आला आहे.
सतेज पाटील म्हणाले, ही नावे मुद्दाम वाचून दाखविली. तुम्हाला कळाले पाहिजे की, या जिल्ह्यात यांना एकही योग्य माणून सापडला नाही का? किमान तज्ज्ञ संचालक नेमताना जिल्ह्यात एकही माणूस सापडू नये, हे दुर्दैव आहे. गोकुळ अमूलच्या दावणीला बांधणार, याची सुरूवात सांगलीतील तज्ज्ञ संचालक नेमून झाली आहे.
सरदार पटेल मिल्ड फेडरेशन नावाची व्यवस्था गुजरातमध्ये झाली आहे. देशातील २० राज्यांत याचा विस्तार केला जाणार आहे. अमूल आणि मदर डेअरी हे दोनच ब्रँड ठेवण्याचे ह्यांचे षडयंत्र आहे. त्याचे खंडन महायुतीतून एकदाही केले नाही, असेही सतेज पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.