Gokul election process and legal dispute: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरवात झाली आहे. दुग्ध निबंधक राजकुमार पाटील यांनी मतदार संस्था प्रतिनिधींना 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याचे आदेश आहेत. या आदेशामुळे तोच वाद पुन्हा गिरवण्याचे चित्र सध्या गोकुळमध्ये सुरु आहे. याअगोदर देखील गोकुळमध्ये ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती.
अंतिम यादी शेवटच्या टप्प्यात असताना अवसायनात निघालेल्या संस्थांचा निर्णय घ्यावा, यानंतर निवडणूक लावावी, अशी याचिका कोल्हापूर सर्किट बेंच येथे दाखल करण्यात आली. त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया रखडली.
त्यामुळे आता देखील तोच मुद्दा समोर येत असल्याने १३०८ संस्थांना घेऊन निवडणूक लढवायची का? त्यांच्या विरहित निवडणूक घ्यायची याबाबत अधिकाऱ्यांना देखील कल्पना नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद धुमसू शकतो.
'गोकुळ'च्या प्रशासनाने यापूर्वीच फेब्रुवारीमध्येच सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांना सभासदांची यादी पाठविली आहे. यामध्ये मे २०२३च्या 'कट ऑफ डेट' नुसार ५ हजार ४७० सभासदांची नोंद आहे. हीच यादी सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे आहे. पुढे जिल्ह्यातील १३२० अवसायनातील संस्थांचा मुद्दा न्यायालयीन झाला.
उच्च न्यायालयाने ८० दिवसांत सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले. सुनावण्या अद्याप सुरूच असताना आजपासून मतदार यादीसाठीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार पाटील यांनी जाहीर केला. त्यांचे आदेश आज सहाय्यक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांना मिळाले.
दरम्यान, आजच्या तारखेला किती संस्था पात्र आहेत, हेही सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयातून सांगितले जात नाही. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाली नाही. तेही संभ्रमावस्थेत असल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे एक जूनपर्यंत नेमक्या किती संस्थांना ठरावासाठी पात्र ठरविले जाणार, याबाबत अधिकाऱ्यांकडून संभ्रमात ठेवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या २६७ संस्थांची सुनावणी होऊन निकाल झाला.
त्यांना पात्र ठरविल्याचे सांगण्यात आले. आतापर्यत जवळपास ९०० संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित संस्थांची सुनावणी १० जून पर्यंत होणे शक्य आहे. मात्र हा निकाल कधी देणार यांचे उत्तर अधिकाऱ्याकडे नाही.
गोकुळ निवडणुकीसीठी पात्र संस्थांबाबत अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. नेमक्या किती संस्थांना ठरावाबाबत पात्र ठरवणार, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे संस्थांना वगळून मतदार यादी तयार होणार की गोकुळने दिलेल्या सर्वच सभासदांना ठरावासाठी पत्र पाठविणार, हे स्पष्ट नाही. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनही मौन बाळगले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.