arun dongale.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : गोकुळचे अध्यक्ष महाडिकांच्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले; म्हणाले, दोन महिन्यांनी....

Akshay Sabale

राहुल गडकर | कोल्हापूर :

गोकुळ दूध संघाची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज ( 30 ऑगस्ट ) पार पडली. जरवर्षीप्रमाणे पाटील आणि महाडिक यांच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळात ही सभा पार पडली. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांवर चिडल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं झालं काय?

सभा सुरू होताच अध्यक्ष अरूण डोंगळे सर्व संचालकांसह व्यासपीठावर दाखल झाले. तेव्हा महाडिक गटातील कार्यकर्त्यांनी विरोधात घोषणाबाजी केली. अध्यक्ष डोंगळे भाषणाला उभारताच ते भडकल्याचे पाहायला मिळाले. "दाखवायच्या वेळी घोषणाबाजी दाखवा... दोन महिन्यांनी संधी मिळणार आहे. त्यावेळी ओरडा," असं म्हणत डोंगळेंनी महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना डिचवलं आहे.

सभेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरूण डोंगळे म्हणाले, "शौमिका महाडिक यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते, त्याचा खुलासा आम्ही केला होता. मात्र, शौमिका महाडिक ( Shoumika Mahadik ) यांनी सभेत येऊन गोंधळ घालायला नको होता."

"गोकुळची सभा ही त्यांच्या डोक्यात नाही, तर त्यांच्या डोक्यात पुढील निवडणुका आहेत. त्यामुळे महाडिक सभेत झेंडे घेऊन आल्या होत्या. ज्या संचालिका आमच्याविरोधात बोलतात, त्या वर्षभरात किती बैठकांना उपस्थित होत्या? किती मुद्दे उपस्थित केले?" असा सवाल अरूण डोंगळे यांनी शौमिका महाडिक यांना उपस्थित केला.

"गोकुळ दूध संघ प्रगती करत असताना तुम्ही त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहात. मला चेअरमन म्हणून ही सभा आणखी दोन तास चालवायची होती. पण, सभासदांच्या चिठ्ठ्या आल्या की लवकर सभा संपवा. सभासदांना व्यासपीठावर बसून प्रश्न विचारण्याची संधी दिलेली असताना तुम्ही मात्र व्यासपीठाच्या समोर खाली बसून प्रश्न विचारत होता. शौमिका महाडिक यांची ही पहिलीच टर्म आहे. या क्षेत्रात त्यांचा अभ्यास कमी आहे," असा टोला अध्यक्ष डोंगळे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT