Satej Patil, Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election 2026 : "महायुतीला धास्ती म्हणून पाठिंबा मागतायत..." मंत्री मुश्रीफ अन् पाटलांच्या वक्तव्यावर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

Satej Patil On Hasan Mushrif : कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोल्हापूरचा मानाचा गणपती समजला जाणारा तुकाराम माळी तरुण मंडळच्या गणेश विसर्जन मिरवणूक उद्घाटनासाठी आमदार सतेज पाटील आले होते. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Rahul Gadkar

Kolhapur News, 25 Sep : गोकुळ निवडणुकी संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना महायुतीमधील अंतर्गत धुसफूस मिटवण्यासाठी गुरुवारी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीकडे 4400 ठराव आहेत. त्यामुळे ही निवडणूक महायुतीकडून एकतर्फी होईल, त्यामुळे सतेज पाटील यांनी पाठिंबा द्यावा असे विधान केले होते.

त्यावर आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी थेट राजकीय वार केले आहेत. कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ते बोलत होते. कोल्हापूरचा मानाचा गणपती समजला जाणारा तुकाराम माळी तरुण मंडळच्या गणेश विसर्जन मिरवणूक उद्घाटनासाठी आमदार पाटील आले होते.

यावेळी बोलताना, आमदार त्यांनी गोकुळ निवडणुकीत गणराया बाप्पा आम्हाला आशीर्वाद देईल, असं म्हणत विरोधकांना आमची धास्ती वाटतीये. त्यामुळे आमचा पाठिंबा मागत आहेत, असं वक्तव्य केलं. शिवाय माझ्या मित्राने दिलेल्या प्रस्तावाचं स्वागतचं आहे. पण निवडणूक होणार, असं म्हणत पाठिंबा देणार नसल्याचंही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, गुरुवारी झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफांनी त्या1400 संस्थांच्या मनातील रोष दूर केला जाईल, असे सांगत असताना विनाकारण निवडणूक लढण्यात अर्थ नाही. त्यामुळे सतेज पाटलांनी पाठिंबा द्यावा, असे वक्तव्य केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT