Kolhapur News, 19 Oct : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. २५ पैकी जवळपास १४ जागांवर विजय मिळवत त्यांनी सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व सिद्ध केले.
विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीतील मंत्री आणि आमदारांची मोठी फौज मैदानात असतानाही सतेज पाटील यांनी बाजी मारली. या निवडणुकीत ठरावधारकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यासाठी शपथा देण्यापासून ते ठरावधारकांना सहलीला पाठवण्यापर्यंतचे डावपेच आखण्यात आले.
मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. ठरावधारकांनी सतेज पाटील यांच्या बाजूने कौल दिल्याने महायुतीच्या पॅनेलला अपेक्षित यश मिळवता आले नाही. या निकालात गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांनाही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे अनेक दिग्गजांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. दरम्यान, महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. त्यांचे पुत्र नविद मुश्रीफ हे गोकुळचे विद्यमान अध्यक्ष असल्याने ही निवडणूक मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.
ठरावधारकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, सत्ताधारी नेत्यांची फौज आणि जोरदार रणनीती असूनही महायुतीला पराभव टाळता आला नाही. दुसरीकडे, सतेज पाटील यांनी गोकुळच्या सत्तासंघर्षात आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.