Gokul government-appointed directors Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul directors news : 'गोकुळ'मधील चार शासन नियुक्त संचालकांचे असे आहे राजकीय कनेक्शन; मंत्री, खासदार, आमदारांचे विश्वासू...

Gokul Milk Union, government-appointed directors, Gokul chairman election : राज्य सरकारने डॉ. प्रवीण हेंद्रे, शिवाजी आडनाईक, कृष्णात पाटील आणि प्रशांत पाटोळे यांची गोकुळवर तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

Rajanand More

Gokul political connections : गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने चार संचालकांची नियुक्ती केली आहे. हे संचालक अराजकीय तज्ज्ञ व्यक्ती असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या चारही संचालकांचे राजकीय कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हे चारही संचालक महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करतील, हे स्पष्ट आहे.

कोर्टाने गोकुळच्या चारही संचालकांना मतदान करण्यास स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे डॉ. प्रवीण हेंद्रे, शिवाजी आडनाईक, कृष्णात पाटील आणि प्रशांत पाटोळे या संचालकांना मतदान करता येणार आहे. मात्र, त्यांची मतांसाठी वेगळी मतपेटी असणार आहे. कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत ही मते सुरक्षित ठेवण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

असे आहे राजकीय कनेक्शन

शिवाजी आडनाईक हे पन्हाळा तालुक्यातील असून जिल्हा बँकेतून विभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आडनाईक यांची नियुक्ती झाली आहे.

डॉ. प्रवीण हेंद्रे हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते पेठवडगावचे रहिवासी असून महाडिक कुटुंबीयांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून भाजपच्या कोट्यातून त्यांचे नाव सुचविले जात असल्याची चर्चा आहे.

कृष्णात पाटील हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून कागल तालुक्यातील रहिवासी आहेत. सहकार क्षेत्रामध्ये त्यांची पकड असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून पाटील यांचे नाव सुचविल्याचे सांगितले जाते.

सतेज पाटील यांनी सर्वाधिक आक्षेप घेतलेले नाव म्हणजे अॅड. प्रशांत पाटोळे. पाटोळे यांचे नाव जनसुराज्य पक्षाकडून सुचविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचे ते निकटवर्ती असल्याचे मानले जाते. विविध संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून पाटोळे यांची ओळख आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT