Gokul Election Result | Navid Mushrif Defeat | Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Navid Mushrif Defeat : हसन मुश्रीफांना मोठा धक्का; गोकुळमध्ये पुत्र नविदचा दारुण पराभव, चालू मतमोजणीतून गेले उठून

Gokul Election Result Update : गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा पिछाडीवरून पराभव झाल्याची बातमी समोर आल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. गोकुळमधील हा निकाल मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिष्ठेचा धक्का मानला जात आहे. तर सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

Jagdish Patil

Gokul Election Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव आणि गोकुळचे विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत खोत यांनी त्यांच्यावर आघाडी घेतली असून, हा निकाल मुश्रीफ कुटुंबासाठी राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. गोकुळच्या मतमोजणीत महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीचे १२ उमेदवार आघाडीवर आहेत, तर समविचारी आघाडीच्या ८ उमेदवारांनी आघाडी घेतली होती.

गोकुळ दूध संघासाठी रविवारी मतदान पार पडले होते. आज मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीचे १४ उमेदवार किरकोळ मतांनी आघाडीवर होते. तर माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे ६ उमेदवार आघाडीवर होते. मात्र, मतमोजणी पुढे सरकताच चित्र बदलले आणि समविचारी आघाडीने मुसंडी मारल्याचे दिसून आले.

दरम्यान, विशेष म्हणजे, विद्यमान अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनाच पिछाडीवर पडावे लागल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अशातच नविद मुश्रीफ यांचा पराभव झाल्याची बातमी समोर आली आहे. तर पराभवाची चाहूल लागताच नविद हे चालू मतमोजणीतून उठून गेल्याची माहिती समोर आली आहे. या निकालामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. गोकुळमधील हा निकाल मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिष्ठेचा धक्का मानला जात आहे. तर सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT